pune crime marathi news Sakal
पुणे

Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार; विवस्त्र करून मारहाण

पुण्यात मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे शहर हादरले आहे. या प्रकारावर संताप देखील व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करत असे. त्याचबरोबर तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करत असे.

कोरोनाच्या काळात चिमुकलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी पाठवले होते. फिर्यादी महिलेचा भाऊ हवाई दलात नोकरी करतो. तो आपल्या कुटुंबासह हवाई दल वसाहतीत राहतो. कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मामी या ९ वर्षांच्या चिमुकलीला सतत मारहाण करत होती. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT