crime sakal
पुणे

Crime News : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; पीडित महिलांची सुटका

सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्स्टाईल मार्केट येथे पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकून अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन पीडित महिलांची सुटका केली. हा छापा सोमवारी ( ता. १३ ) पहाटे सव्वादोन च्या सुमारास टाकण्यात आला होता.

पोलिस शिपाई योगेश मनोहर गोलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्सटाईल मार्केट पत्र्याच्या शेडमध्ये अवैद्य वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटे सदर ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी दिवाकर मुहू शेट्टी ( वय ५४, मूळ रा. वल्लदूर तोटा, पोस्ट पादूर, ता. मणी, जि. मणी राज्य कर्नाटक ) पिंटू कुमार कैलास भुइया ( वय ३१ रा. खैरा, ता.मयूरईन्ड जि. चतरा, राज्य झारखंड ), श्रीधर लक्ष्मण शेट्टी ( रा. सनशाईन ग्रीन पार्क, बिल्डिंग नं. ४, बी विंग, फ्लॅट नंबर ०२, फादरवाडी, वसई ईस्ट, पालघर ) यांनी रतन रामचंद्र कुलंगे ( रा. कुलंगेवस्ती पांढरेवाडी, ता. दौंड जि. पुणे ) यांचे मालकीचे पत्र्याचे शेड व सात खोल्या करार करून चालविण्यास घेतल्या आहेत.

सदर ठिकाणी वरील तीन व्यक्ती अवैद्य वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी छापा मारला असता मूळ राहणार कोलकत्ता पश्चिम बंगाल येथील तीन पीडित महिलांना वेश्याव्यवसाय भाग पाडण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी दिवाकर मुहू शेट्टी, पिंटू कुमार कैलास भुइया, श्रीधर लक्ष्मण शेट्टी यांच्या विरुध्द दाखल करण्यात आला आहे. हे तीनही आरोपी फरारी झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७०, ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT