dilip walase patil sakal
पुणे

बैलगाडा मालकांवरील गुन्हे घेणार मागे - गृहमंत्री वळसे पाटील

राजकारण न करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मंचर : ‘‘बैलगाडा मालकांवर विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. गुन्हे मागे घेतले जातात म्हणून कोणी कायदा हातात घेऊ नये. कायदा, सुव्यवस्था व शांतता टिकवण्याचे काम सर्वांनी करावे. या पुढच्या काळात नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी,’’ असा सूचक इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walase patil) यांनी दिला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा विषय काढला. ते म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपणही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत. वळसे पाटील व मी एकत्र आल्याशिवाय

बैलगाडा शर्यत प्रश्न मार्गी लागणार नाही. बैलगाडा मालकांना मी सांगितले होते की, वळसे पाटील यांची भेट घेऊन तारीख निश्चित करून त्यांच्या उपस्थितीत आपण बैलगाडा मालकांच्या बैठकीचे आयोजन करू.’’

यासंदर्भात वळसे पाटील म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यती सुरु होण्याबाबत कोणीही राजकारण करू नये. सर्व पक्ष व नेते यांचा बैलगाडा शर्यतींना पाठिंबा आहे. राज्य व केंद्र सरकारही आपल्या बरोबरच आहे. खरी अडचण अशी आहे की, केंद्र सरकारने बैलाचा समावेश संरक्षण प्राण्यांमध्ये केला आहे. काही संस्था न्यायालयात गेल्या असून, त्यांनी बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेली सुनावणी व निर्णय झाल्याशिवाय बैलगाडा शर्यतचा प्रश्न सुटणार नाही. त्यापूर्वी केंद्र सरकारने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळले पाहिजे. याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे तातडीने सुनावणी होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अर्जही दाखल केला आहे.’’

बैलगाडा शर्यतीचा प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातूनच मार्गी लागेल. कोरोनाचे संकट अजून दूर झाले नाही. या परिस्थितीत बैठका व मेळावे घेऊन उपयोग होणार नाही. कोरोनापासून नागरिकांनी सतर्क राहावे.

- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

Salman Khan: ''आमची गँग अ‍ॅक्टिव्ह आहे'' सलमान खानला पुन्हा धमकी; लॉरेन्सचा भाऊ बोलत असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT