CCTV cameras 
पुणे

पिंपरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मिळेना मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत हिंजवडी आयटी पार्कच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) देण्यात येणारा १५ कोटी रुपयांचा निधी अडकून पडला आहे. त्यामुळे कॅमेरे बसविण्याच्या कामाला कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रश्‍नावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनकडून अनेक वर्षांपासून सरकारी पातळीवर यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. आयटी पार्कमध्ये कॅमेरे बसविण्यासंदर्भात उद्योग विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ९ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्याच्या अवधीत हा निधी महापालिकेला स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र, तीन महिन्यांचा अवधी उलटून गेल्यानंतरही हा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आयटी पार्कची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आयटी पार्कमध्ये कोणत्या भागांत सीसीटीव्ही बसवायचे आहेत, त्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊनही बराच अवधी उलटला आहे. या ठिकाणी सर्वांत गर्दीचा परिसर, आयटी कंपन्यांच्या बाहेरील भाग, परिसरातील प्रमुख चौकांत कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. ते अत्याधुनिक असणार आहेत. सर्व कॅमेरे पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत.

पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनांवर कॅमेरे
आयटी पार्क परिसराच्या सुरक्षेसाठी हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन आणि पोलिस यांच्या वतीने तीन वाहनांच्या साह्याने २४ तास गस्त घालण्यात येते. परिसरातील हालचाली टिपण्यासाठी या गाड्यांवर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. डिसेंबरपासून गस्त घालणाऱ्या या वाहनाने दर महिन्याला चार हजार किलोमीटर फिरणे सक्‍तीचे केले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये गाड्यांचे किलोमीटर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.

दृष्टिक्षेपात...
आयटी पार्क परिसरात एकूण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या - सुमारे चार लाख
महिला कर्मचाऱ्यांची संख्या - एक लाख ६० हजार (सुमारे ४० टक्‍के)
सुरक्षेसाठी परिसरात गस्त घालणाऱ्या गाड्यांची संख्या - ३
प्रस्तावित असणाऱ्या सीसीटीव्हीची संख्या - ८० 
सीसीटीव्हीसाठी एमआयडीसीकडून मिळणारा निधी -१५ कोटी रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT