Celebrating great mens birth anniversary health check-up camps marks modern India giriraj Sawant sakal
पुणे

Pune News : आरोग्य तपासणी शिबिराने महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे आधुनिक भारताची नांदी; सावंत

महापुरुष आज जर पृथ्वीवर आले तरी लोक त्यांना बाजूला सारून ,त्यांच्या विचारांची पायमल्ली करून त्यांच्याच समोर डीजेवर नाचतील

किशोर गरड

आंबेगाव : 'महापुरुषांच्या जयंती दिवसाच्या झेंडे प्रेमावर दुसऱ्या दिवशी तितके प्रेम दिसत नाही. आदिवासीपाडा कोळेवाडी येथे आपण आरोग्य तपासणी शिबिराने महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत ही आधुनिक भारताची एक नांदी म्हणता येईल.

महापुरुष आज जर पृथ्वीवर आले तरी लोक त्यांना बाजूला सारून ,त्यांच्या विचारांची पायमल्ली करून त्यांच्याच समोर डीजेवर नाचतील. लोक महापुरुषांच्या विचारांपेक्षा त्यांच्या फोटोला महत्व देत आहेत ही खेदजनक गोष्ट आहे'.असे प्रतिपादन गिरिराज सावंत यांनी केले. क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित आरोग्य शिबीरावेळी ते बोलत होते.

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आदिवासीपाडा कोळेवाडी येथे युवा संवाद सामाजिक संस्थेच्यावतीने आणि ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात हिमोग्लोबिन,रक्तदाब ,रक्त घटक चाचणी,मधुमेह तपासणी,नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप आदींचा समावेश होता.

शिबिराचे उद्घाटन कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत,भाजपा युवा मोर्चा चिटणीस प्रवीण वनशिव,ऑरा मल्टीस्पेशालिटीच्या संचालिका डॉ.शीतल कल्याणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी वनशिव बोलताना म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती उत्सव हा डीजे वर नाचून न करता त्यांचे विचार आचरणात आणून करायला हवी.तीच खरी त्यांची मानवंदना ठरेल.

डॉ.शीतल कल्याणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.धनराज गरड यांनी केले. मोफत आरोग्य तपासणीत दोनशे नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी,आकाश कदम , प्रबुद्ध प्रक्षाळे ,रघुनाथ चोरघे,सुरेश धानवले,बाळासाहेब धोका, नितीन जांभळे पाटील , राहुल बेलदरे पाटील, यशवंत हरिभक्ते ,अनिल रेळेकर, दामोदर शेलार ,रामदास सुर्यवंशी ,जेष्ठ नागरिक साधू शेलार यांचेसह आदिवासी पाडा कोळेवाडी युवक समितीचे पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT