Chakan industrial estate of relocation due basic facility  sakal
पुणे

Chakan News : चाकण औद्योगिक वसाहत स्थलांतरित होण्याचा धोका?

औद्योगिक वसाहतीचे पाच टप्पे झाले.परंतु पाच टप्पे होताना पायाभूत सुविधांचा मात्र अभाव आहे. मुख्य रस्त्यांची कामे झाली नाही.

हरिदास कड

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीचे पाच टप्पे झाले.परंतु पाच टप्पे होताना पायाभूत सुविधांचा मात्र अभाव आहे. मुख्य रस्त्यांची कामे झाली नाही. अरुंद रस्ते,वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, विजेचे प्रश्न, पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न व इतर कारणामुळे उद्योजक,कंपनी मालक,कामगार सारेच वैतागले आहेत .

राज्य सरकारने समृद्धी महामार्गावर तसेच मराठवाड्यात इतर ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याने चाकण औद्योगिक वसाहत पुढील काळात टिकेल का?या ठिकाणी भविष्यात कंपन्या राहतील का असा सवाल निर्माण होतो आहे.

चाकण ता. खेड येथील औद्योगिक वसाहत ही जगातील एक महत्त्वाची वसाहत मानली जाते. या वसाहतीला अमेरिकेतील डेट्राईट सारखी वसाहत, हब म्हणून ओळखले जाते. औद्योगिक वसाहतीत सुमारे तीन लाख कामगार काम करतात. सुमारे पाच हजार कंपन्यांचे जाळे आहे. यामध्ये राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्याचे मोठे जाळे आहे.

मोठया कंपन्यावर छोटे उद्योग तसेच व्यवसाय अवलंबून आहेत . परिसरातील गावातील उद्योगधंदे, व्यवसाय, भाड्याच्या खोल्या, गोदामे या औद्योगिक वसाहतीवर अवलंबून आहेत. या औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांचा मात्र मोठा अभाव आहे.

त्यामुळे भविष्यात ही वसाहत या ठिकाणी राहील का अशी चिंता नागरिकांनाही, व्यवसायिकांना निर्माण झाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत काही कंपन्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश ,झारखंड या राज्यात जात आहेत तेथे सुविधा अधिक मिळत आहेत तसेच कंपन्यांना करातही सवलत वीज दरात सवलत व इतर पायाभूत सुविधा व्यवस्थित मिळत असल्याने काही कंपन्या या राज्यात स्थलांतरित करत आहेत हे वास्तव आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीत सुविधा देण्याकडे मात्र नेत्यांचा कल नाही त्यामुळे उद्योजक, कामगार वैतागले आहेत हे भयानक वास्तव आहे.

पायाभुत सुविधांचा मोठा अभाव

येथील औद्योगिक वसाहतीत "एमआयडीसी "ने अंतर्गत रस्त्यांचे जाळे केले परंतु बहुतांश अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्यावर खड्डे पडतात आणि पाणी साचते त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.मोठी, छोटी, अवजड वाहने त्यात आदळतात.

त्यातून अपघातही सातत्याने घडतात हे भयानक वास्तव आहे. या मार्गाला जोडणाऱ्या मुख्य मार्ग पुणे -नाशिक महामार्ग, चाकण -तळेगाव,चाकण -शिक्रापूर या मार्गाची अवस्था ही भयानक आहे.या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झालेले आहेत. मार्गांवरून पाणी जाण्यासाठी जागा नाही.

पावसाळ्यात मार्गावरच पाणी साचते. मार्गावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे कामगार वेळेवर कंपनीत कामाला येऊ शकत नाही. या परिस्थिती ला उद्योजक, कंपन्यांचे प्रतिनिधी, कर्मचारी सारेच कंटाळले आहेत.

वीज पुरवठा, पाण्याच्या, कचऱ्याच्या समस्याही आहेत. या मुख्य व अंतर्गत मार्गावरून औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर,टँकर, बस आदी व इतर ये -जा करत असल्यामुळे या वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गांची कामे होणे गरजेचे आहे. परंतु गेली पंचवीस वर्षापासून मार्गाची दुरावस्था "जैसे थे" आहे. मार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेक कामगारांचे जीव अपघातात गेले आहेत व काही जखमी झाले आहेत.

गुन्हेगारी, ठेकेदारी विळखा....

औद्योगिक वसाहतीत कंपन्यातील विविध कामांचे ठेके, अगदी कंपन्यातील भंगार मिळविण्यासाठी काही सराईत गुन्हेगार,काही स्थानिक पुढारी, अगदी काही मंत्री,काही पोलीस अधिकारी,नेते सातत्याने प्रयत्न करतात. त्यातून वादावादी व इतर प्रकार ही घडतात. कंपन्यातील कंपनी प्रतिनिधी काही व्यवस्थापन कर्मचारी यांचाही ठेकेदारी मिळविणाऱ्या लोकांना पाठिंबा असतो त्यात भागीदारी असते हे वास्तव आहे.

काही गुन्हेगार खंडणी, हप्ते गोळा करण्याचे प्रकार करतात. त्यांना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असतो.काही गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतात तर काही अजिबात होत नाही. त्यामुळे "तेरी भी चूप, मेरी भी चूप "असे प्रकार या औद्योगिक वसाहतीत घडतात. गैरप्रकारांना काही कंपनी मालक, कंपनी व्यवस्थापन कंटाळले आहे. त्यामुळे इतर ठिकाणी जाण्याच्याही ते शोधात आहेत.

उद्योजक योगेश वाके, विजय बोत्रे, कामगार नेते जीवन येळवंडे यांनी याबाबत सांगितले की, "चाकण औद्योगिक वसाहत मोठी आहे.या औद्योगिक वसाहतीतून सरकारला कर रूपाने मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. परंतु येथे अजिबात पायाभूत सुविधा दिल्या जात नाही. अंतर्गत रस्ते, मुख्यमार्गांची कामे काहीच नाही.त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होते. औद्योगिक वसाहतीत पायाभुत सुविधा करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही.

औद्योगिक वसाहतीत काही मंत्र्यांच्या नातेवाईकांचा मोठा हस्तक्षेप राहतो. औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही.वाहने पार्किंग करण्यासाठी स्वतंत्र मोठ्या जागा नाहीत. ही वाहने मार्गांवर कोठेही लावली जातात. औद्योगिक वसाहतीत मोठ्या समस्या आहेत. या समस्या सोडविल्या नाही तर येथील उद्योग बाहेर जातील ही भीती आम्हाला वाटत आहे. वसाहतीत दुर्गधीयुक्त कचरा अगदी रस्त्याच्या कडेला ढीग लागून तसाच साचून राहतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT