Crime sakal
पुणे

Chakan Crime : खराबवाडीत दरोडा टाकणार्‍या टोळीला महाळुंगे पोलिसांनी बारा तासात केली अटक

प्लॅस्टिक दाण्याच्या आठशे बॅग भरून उभ्या असलेल्या ट्रकमधील ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक व चालकाच्या जवळील मुद्देमाल चोरट्यानी लांबवीला होता.

हरिदास कड

चाकण - चाकण जवळची खराबवाडी, ता. खेड येथील एका पेट्रोल पंपाजवळ प्लॅस्टिक दाण्याच्या आठशे बॅग भरून उभ्या असलेल्या ट्रकमधील एका ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक व चालकाच्या जवळील मुद्देमाल चोरट्यानी लांबवीला.

याप्रकरणी सहा आरोपींना महाळुंगे पोलिसांनी बारा तासात ताब्यात घेऊन अटक केली व त्यांच्याकडून चोरी गेलेला सुमारे सदतीस लाख रुपये किमतीचा माल ट्रकसहीत जप्त केला आहे. अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी, ता. खेड गावच्या हद्दीतील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ ता. ३० ते १ डिसेंबर च्या रात्री महाळुंगे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्लॅस्टिक दाण्याच्या आठशे बॅग भरून तो माल फुरसुंगी, पुणे येथे खाली करण्यासाठी ट्रकमधून चालवीला होता. ट्रकचालक पेट्रोल पंपाजवळ ट्रक बाजूला उभी करून आराम करत होता. त्यावेळी काही अज्ञात व्यक्ती त्या ट्रकमध्ये घुसल्या.

चालकाच्या तोंडावर हाताने चापटी मारून त्याला मारहाण केली.चालकाच्या तोंडावर टॉवेल टाकून त्याच्या ताब्यातील प्लॅस्टिक दाण्यांनी भरलेला ट्रक जबरदस्तीने पळवून नेला. चालकाजवळील रोख रक्कम तीन हजार रुपये, मोबाईल चोरून नेला. चालकाला तळेगाव पोलिस ठाण्याच्या जवळ रस्त्यावर सोडून दिले. याबाबत ट्रक चालक विजय तुकाराम पिंगळे (वय-५२ वर्षे, रा. माळवाडी (लाटे), ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली.

त्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे पोलिस ठाण्यात अनोळखी ५ ते ६ जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त,वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने काही सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबी तपासल्या. काही गुप्त बातमीदारा मार्फत आरोपींचा शोध घेतला.

पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांना खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर बारा तासात आरोपींना अटक केली. यामध्ये भारत आनंद सारवे (वय-२३ वर्ष, रा. महाळुंगे, मूळ रा-यवतमाळ) सागर यशवंत पाटील (वय- २४ वर्षे, सध्या रा-महाळुंगे, मूळ रा.जि. जळगाव) संतोष उर्फ दाजी विठ्ठल काळे (वय-29 वर्षे, सध्या रा. महाळुंगे, मूळ रा-दोंदे, ता. खेड, जि. पुणे) निरंजन राजेंद्र पाटील (वय-२१ वर्षे, सध्या रा. महाळुंगे, मूळ रा. जि. जळगाव) आशिष उर्फ बबलू वसंत आडे (वय-२८ वर्षे, सध्या रा. चिंबळी फाटा, ता. खेड, मूळ रा. जि. यवतमाळ) विकास सुखलाल पवार (वय-२२ वर्षे, सध्या रा-महाळुंगे, मूळ रा-जि. जळगाव) आदी सहा आरोपीना अटक केली असून, त्यांच्याकडून सतरा लाख रु. किंमतीचा एक ट्रक, वीस लाख रुपये किमतीच्या आठशे प्लॅस्टिक दाणा असलेल्या गोण्या असा सुमारे सदतीस लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस हवालदार राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, संतोष होळकर, तानाजी गाडे, राजू जाधव, पोलीस नाईक संतोष काळे, किशोर सांगळे, पोलीस शिपाई शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, बाळकृष्ण पाटोळे, अमोल माटे, राहुल मिसाळ, शरद खैरे आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT