Pune sakal
पुणे

Pune: चाकणची वाहतूककोंडी फुटणार, बाह्यवळण मार्ग होणार!

Chakan Latest News: चाकणच्या प्रस्तावित बाह्यवळण मार्गासाठी शंभर कोटींची तरतूद | Chakan Traffic Congestion to Ease with Alternate Route Pune News Update

हरिदास कड

Chakan Traffic news: चाकण व परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकणचा प्रस्तावित गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित बाह्यवळण मार्ग रासे फाटा,कडाचीवाडी, मेदनकरवाडी,बंगला वस्ती या मार्गाच्या कामासाठी तसेच भूसंपादनासाठी पीएमआरडीएने शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाला काही महिन्यात गती मिळणार आहे अशी माहिती पीएमआरडीए चे क्षेत्रीय अभियंता जितेंद्र पगार यांनी "सकाळ" ला दिली.

चाकण, ता. खेड येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेषत:चाकण -शिक्रापूर तसेच चाकण -तळेगाव मार्गावरील व पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए चा रासेफाटा कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा प्रस्तावित 36 मीटर रुंदीचा बाह्य वळण मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गात संपादित होणाऱ्या बहुतांश जमिनी या शेतकऱ्यांच्या आहेत. या मार्गाची हद्द निश्चिती तसेच मोजणी यापूर्वी करण्यात आली आहे.

औद्योगिक वसाहतीतील कंपन्यातील अवजड वाहनांची ये -जा मोठ्या प्रमाणात पुणे- नाशिक महामार्ग, चाकण -शिक्रापूर, चाकण -तळेगाव या मार्गाने असते त्यामुळे ही वाहने तळेगाव चौक,माणिक चौक, आंबेठाण चौकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नागरिक,कामगार, उद्योजक,विद्यार्थी,शेतकरी सर्वच या वाहतूक कोंडीला वैतागले आहेत. ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांच्या चाकण वाहतूक विभागाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु कोंडी काही सुटत नाही.

ही कोंडी सोडविण्यासाठी चाकणला बाह्यवळण मार्ग होणे गरजेचे आहे परंतु हे बाह्यवळण मार्ग होत नाही ते लाल फितीत अडकले आहेत असेच मानले जाते. चाकणला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत उभी राहिली परंतु मुख्य मार्ग तसेच अंतर्गत रस्ते, बाह्यवळण मार्ग होण्याकडे राजकीय नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, एमआयडीसीच्या अधिकारी महसूल विभाग,बांधकाम विभाग यांनी अजिबात लक्ष दिले नाही असाही आरोप नागरिकांचा, उद्योजक,कामगारांचा आहे.

चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. तसेच चाकण नगरपरिषद शेजारील ग्रामपंचायतीही रस्त्यावरील अतिक्रमणे काढत नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग तर तेरी भी चूप,मेरी भी चुप अशाच स्थितीत आहे अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात रस्ते गिळंकृत केले आहेत त्यामुळे छोटे रस्ते वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहेत .

या वाहतूक कोंडीमुळे तसेच मार्गांच्या दुरावस्थेमुळे सातत्याने अपघात होत आहेत त्यात अनेक कामगारांचे,निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. पण याकडे कोणाचेच लक्ष नाही अशी विचित्र अवस्था आहे. चाकणची परिस्थिती बकाल झाली आहे. या बकाल परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी चाकणला पर्यायी बाह्य वळण मार्ग हवेच अशी नागरिकांची, उद्योजक, कामगारांची, विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.

बाह्यवळण मार्ग साधारणणे अडीच किलोमीटर अंतराचा आहे.

रासे फाटा येथून चाकण -शिक्रापूर मार्गा पासून सुरू होणारा आहे.

रासे,कडाचीवाडी, मेदनकरवाडी या गावाच्या हद्दीतून जाणारा आहे.

पुणे -नाशिक महामार्गाला बंगलावस्ती जवळ जोडणारा आहे.

प्रस्तावित बाह्य वळण मार्गाच्या हद्द निश्चितीची मोजणी डिजिपीएस कोर्स सॅटेलाईट यंत्रणेची मशीन, टोटल स्टेशन या मशीनद्वारे करण्यात आली आहे.हा बहुतांश मार्ग ओढ्याच्या कडेने जाणारा आहे.

चाकणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी बाह्य वळण मार्ग महत्त्वाचा आहे. या बाह्यवळण मार्गाचे काम येत्या वर्षभरात 2024-25अखेर पूर्ण होण्याची शक्यता पीएमआरडीए च्या संबंधित अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पीएमआरडीएचे क्षेत्रीय अभियंता जितेंद्र पगार यांनी ही बाह्यवळण मार्गाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे असे सांगितले.

बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी पीएमआरडीए निधी खर्च करणार आहे. हा मार्ग काही ठिकाणी ओढ्याला खेटून जातो. त्यामुळे ओढा काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट चा वापर करून नाल्यासारखा करण्यात येणार आहे. काही ठिकाणी ओढ्या, नाल्यावर मोऱ्या करण्यात येणार आहेत. हा मार्ग काही अंतराचा काँक्रिटीकरण व काही अंतराचा डांबरीकरण असणार आहे. तसेच हा मार्ग चौपदरी असणार आहे. मार्गाच्या मध्यभागी दुभाजक असणार आहे. या प्रस्तावित मार्गांमध्ये काही इमारती,बांधकामे येत आहेत ज्या अनधिकृत इमारती, बांधकामे आहेत त्या पीएमआरडीए च्या वतीने पाडण्यात येणार आहेत. असे पीएमआरडीए च्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रासेफाटा,कडाचीवाडी, मेदनकरवाडी या प्रस्तावित बाह्यवळण मार्गाचे काम पीएमआरडीए ने लवकरात लवकर करावे अशी आग्रही मागणी सरपंच,पदाधिकारी, कामगार,उद्योजक, शेतकरी व इतरांनी केली आहे.सकाळ ने वेळोवेळी बातम्या देऊन याचा पाठपुरावा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT