पुणे - भारत हे येत्या काळात जागतिक घडामोडींचे केंद्र असणार आहे. निश्चितपणे जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान असेल. अर्थव्यवस्थेच्या विकासासह गुणवत्तापूर्ण आर्थिक विकास हे आपल्यापुढील आव्हान आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या २९व्या पदवीप्रदान कार्यक्रमात प्रधान बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे कुलगुरू अजित रानडे या वेळी उपस्थित होते. पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी पदवी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. प्रधान म्हणाले,‘‘पुणे हा कल्पनांचा ‘मेल्टिंग पॉट’ आहे.
विद्यार्थ्याची महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर स्वतःबद्दलची, कुटुंब, समाज, देश आणि मानवतेप्रती भूमिका बदलणार आहे. जग वेगाने बदल असताना आपण स्वतःला जीवनकौशल्यासाठी तयार केले पाहिजे. देशाची व्यवस्थाच गोखले संस्थेतून निर्माण झाली. देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी गोखले संस्थेत आहे.’
डिजिटल पेमेंट इंटरफेसमध्ये भारताने जे साध्य केले, ते जगाला जमलेले नाही. आता विद्यार्थ्यांचा विचार स्वतःच्या पॅकेजपुरता मर्यादित न राहता जगाचा विचार करणारा असायला हवा.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी आंदोलनावेळी गोखले संस्थेने सर्वेक्षणाचे मोठे काम केले. शेतकरी आत्महत्येबाबतचा अभ्यास गोखले संस्थेनेच केला होता. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा विषय उद्भवला असताना पुन्हा गोखले संस्थेची मदत घेतली जाईल. आताच्या काळात देशासाठी जगणे आवश्यक आहे. संस्थेच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या राज्य शासनाच्या माध्यमातून दूर केल्या जातील.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.