challenge of wolf conservation to forest department signs of extinction of native species Sakal
पुणे

वन विभागापुढे लांडग्यांच्या संवर्धनाचे आव्हान; मूळ प्रजाती नष्ट होण्याची चिन्हे

द ग्रासलॅंड ट्रस्टच्यावतीने २०१३-१४ पासून लांडगा आणि कुत्र्याच्या संकरित प्रजाती संदर्भात संशोधन करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कुत्रा आणि लांडगा यांच्यातील संकराच्या घटना जगभरात घडल्या आहेत. नुकतेच महाराष्ट्रातही पुण्याजवळ संकरित प्रजातीचे ठोस पुरावे आढळले आहेत. जगभरातील लांडग्यांची सर्वांत प्राचीन प्रजातींपैकी एक असलेला ‘भारतीय लांडगा’ या संकरामुळे धोक्यात आला असून त्याचे संवर्धन करण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे असणार आहे.

द ग्रासलॅंड ट्रस्टच्यावतीने २०१३-१४ पासून लांडगा आणि कुत्र्याच्या संकरित प्रजाती संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. ट्रस्टचे संस्थापक मिहीर गोडबोले सांगतात, ‘‘लॉकडाउनच्या दिवसांत आम्हाला पुण्याच्या जवळच पुन्हा एकदा तसाच पिवळसर प्राणी दिसला.

नंतर एक मादीही दिसली, जी दिसत तर लांडग्यासारखी होती, पण तिच्या त्वचेवर पट्टे होते. शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन आणि वनविभागाची परवानगी घेऊन त्यांनी मग या प्राण्याचे केस आणि विष्ठा गोळा केली. त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण केल्यावर हा प्राणी कुत्रा आणि लांडग्याचा संकर असल्याचे सिद्ध झाले.’’

अशा संकराचा वैज्ञानिक अभ्यासातून ठोस पुरावा मिळण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती. द ग्रासलँड्स ट्रस्टसोबतच अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्वहार्यन्मेंट (अत्री) आणि नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस) यांनी केलेले हे संशोधन जर्नल ऑफ इकॉलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये प्रकाशित झाले आहे. हा संकरित प्राणी नव्या पिल्लांना जन्म देऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

संकराचा धोका काय?

जंगलातील अशा संकरामुळे लांडग्यांची प्रजाती संकटात सापडू शकते. त्यांची वेगळी जनुकीय ओळखच मिटून जाऊ शकते. संकरामुळे एखाद्या प्रजातीचा ‘जीन पूल’ (जनुकीय वैशिष्ट्ये) पुसट होत जातो. मिहीर गोडबोले सांगतात, ‘‘कुत्र्यांमुळे रेबिजसारखे आजार आणि व्हायरसची लागण लांडग्यांना होऊ शकते. यातील काही विषाणुंचा संसर्ग झाल्याने एखाद्या भागात राहणारे सर्व जंगली लांडगे मरून जाऊ शकतात.’’

संकर होण्याचे कारण?

जनुकीयदृष्ट्या कुत्रा आणि लांडगा हे प्राणी अगदी जवळचे नातेवाईक आहेत. लांडग्यांपासूनच कुत्र्यांची उत्क्रांती झाली. एखाद्या ठिकाणी लांडग्यांची संख्या कमी झाली तर त्यांना नवा जोडीदार मिळू शकत नाही.

अशा वेळी ते कुत्र्यांसोबत संकर करतात. माळरानांवर मानवी हस्तक्षेपात वाढ झाली असून शेती, गुरे चारने, कचरा फेकणे, अशा गोष्टींमुळे ती संकटात आली आहेत. शहरीकरणामुळे भटके कुत्रेही माळरानावर येतात आणि जंगली लांडग्यांसोबत त्यांचा संपर्क वाढतो.

उपाय काय?

भारतीय लांडग्यांच्या संरक्षण किंवा संवर्धनासाठी पुरेसे प्रयत्न व्हायला हवेत. गोडबोले सांगतात, ‘‘राज्याच्या वन विभागाकडे मुळ लांडग्यांच्या संवर्धानासाठी अहवाल सादर केला आहे. प्रथम लांडग्यांची संख्या मोजून, संकर नसलेला भाग निश्चित करावा लागेल. मूळ लांडग्यांची ओळख पटवून त्यांच्या संवर्धनासाठी इतर प्रयत्न करावे लागतील.’’ राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील पुणे, गोंदिया, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि सातारा जिल्ह्यात ही संकरित प्रजाती आढळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT