Petrol Diesel Price: Nitin Gadkari Sakal
पुणे

Chandani Chowk Inauguration: पुण्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार; गडकरींची घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे शहरातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली. चांदणी चौक नुतणीकरणानंतरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुणे शहराला प्रदुषणमुक्त करण्याचा मानस बोलून दाखवला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना देखील केल्या. (Chandani Chowk Inauguration Petrol diesel to be banished from Pune Nitin Gadkari announcement)

गडकरी म्हणाले, "पुणे शहर आज खूपच प्रदुषित झालं आहे. मी ट्रोन्सपोर्ट मंत्री आहे त्यामुळं मी ठरवलं आहे की, पेट्रोल-डिझेल या देशातून हद्दपार करायचं. त्यामुळं इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, एलएनजी, बायो एलएनजी, बायो सीएनजी यावर मी स्वतः आग्रहानं काम करतो आहे. मी स्वतः दिल्लीत आता हायड्रोजनच्या गाडीत फिरतो, इलेक्ट्रिकच्या गाडीत फिरतो"

पुणे पेट्रोल-डिझेलमुक्त करणार

पुण्याला जर पेट्रोल-डिझेलपासून मुक्त केलं तर प्रदुषण कमी होईल. आता इलेक्ट्रिक तर आलंच आहे. येत्या पाच वर्षात सर्व बसेस इलेक्ट्रिकवर चालणार आहेत. आता पुण्यापासून मुंबई, नाशिक तसेच पुणे ते नागपूरपर्यंत इलेक्ट्रिक बस चालणार आहेत. फडणवीस आणि मी नागपूरमध्ये रिंगरोडवर केबलवर इलेक्ट्रिक बस सुरु करतो आहोत, असंही यावेळी गडकरी म्हणाले. (Latest Marathi News)

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले पंपही बंदच

इथेनॉल हे स्वदेशी इंधन आहे, त्यामुळं पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी तीन इथेनॉल पंपांचं उद्घाटन केलं. पण तिथं एकही थेंब इथेनॉल विकलं जात नाही. त्याचं कारण महाराष्ट्र सरकारनं पुण्यातील ज्या ऑटोरिक्षा आहेत, त्यात बदल केलेला नाही.

माझी अजित पवारांना, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पुण्यात ज्या ऑटो रिक्षा आहेत त्या फ्लेक्स इंजिनमध्ये रुपांतरीत करा. तसेच नवी ऑटोचं परमिट हे इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर देणं जर तुम्ही केलं तर पुण्यातील प्रदुषण कमी व्हायला मदत होईल. (Marathi Tajya Batmya)

पुण्यात कचऱ्यापासून वीज बनवू नका

पुण्यात कचऱ्यापासून वीज तयार करु नका, तुम्ही कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. कारण ग्रीन हायड्रोन हे आता भविष्य आहे. माझ्याजवळ जी टोयोटाची गाडी आहे जी जपानमध्ये बनलेली आहे. तीचं नाव मिराई आहे, ही गाडी हायड्रोजनवर चालते. ही गाडी मी दिल्लीत चालवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT