आज मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकातील पुल पाडण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थिती होते. स्फोट झाला, पुल पडला, राडारोडा काढण्याचे काम हि सुरू झाले, पहाटे 5 वाजून 20 पुन्हा डॉ. देशमुख चांदणी चौकात काम पाहण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत हजर झाले, एकीकडे, हजारो हात रस्ता मोकळा करण्यासाठी संपूर्ण रात्र मेहनत घेत असतानाच, दुसरीकडे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी देखील रात्रभर "फील्ड"वर हजर होते, "सर अजून घरी गेले नाहीत का ? " या प्रश्नावर देशमुख यांचे उत्तर होते, "काम झाले की जाऊच की" !
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा अनुभव घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथील एन डी ए रस्ता - बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी बराच काळ प्रतिक्षा केल्यानंतर अखेर शनिवार, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजता पुल पाडण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार नियोजन केल्यानंतर जिल्हाधिकारी देशमुख यांनी शनिवारी सायंकाळी चांदणी चौकात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीची माहिती पत्रकारांना दिली.
दरम्यान, शनिवारी रात्री 11 वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. पहाटे 2 ऐवजी 1 वाजताच चांदणी चौकातील पुल पाडण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, जिल्हाधिकारी डॉ.देशमुख हे स्वतः 1 वाजता हजर राहिले. त्यानंतर ते तेथीलच "एनएचआयए" कार्यालयात बसून कामाचा आढावा घेत होते. स्फोट झाले, त्यानंतर तेथील राडारोडा काढण्यासाठी असंख्य यंत्रे कामाला लागली, हजारो हात अवघी रात्र राडारोडा बाजूला काढून रस्ता मोकळा करण्यासाठी धडपड करीत होते.
दरम्यान, एकीकडे यंत्रांच्या मदतीने पुलाचे अवशेष बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. पहाटे 5.20 वाजताची वेळ होती. रात्रभर जागे असलेले जिल्हाधिकारी डॉ.देशमुख हे "एनएचआयए"च्या कार्यालयातून पुन्हा काम सुरू असलेल्या चांदणी चौकात येऊन कामाचा आढावा घेऊ लागले. यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त भोईटे, सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डीसले हे हि उपस्थित होते. भोईटे यांनी देशमुख यांना सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. त्यावेळी डॉ. देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला, " सर, तुम्ही अजून घरी गेला नाहीत का ? " या प्रश्नावर आपल्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य फुलवीत " एवढे काम झाले की जाऊच की"असे उत्तर देत आपल्यातील कर्तव्य बजावण्याच्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.