Chandrasekhar Bawankule statement Inflation low compared to world inflation  esakal
पुणे

जगाच्या तुलनेत महागाई कमीच; चंद्रशेखर बावनकुळे

बावनकुळे; घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘महागाई हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित विषय आहे. त्यावर फार बोलण्याने काही उपयोग होत नाही. १० वर्षांपूर्वी ४० हजार रुपयांचा मोबाईल, आज चार हजार रुपयांना मिळतो. यावरून गेल्या १० वर्षांत महागाईच्या दराच्या तुलनेत तो स्वस्तच आहे, हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे सांगत देशात वाढलेली महागाई ही जगाच्या तुलनेत कमीच आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. पुणे दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, गणेश बिडकर, गणेश घोष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दर कमी झाले की मोदी सरकारमुळे कमी झाले, जास्त झाले की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे झाले, हे कितपत योग्य आहे, या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘समाजामध्ये चांगली गोष्ट घडली की त्यांचे श्रेय घेतले जाते. हे घडतच राहणार आहे. पूर्वी डिझेल- पेट्रोलवर केंद्र सरकारचा कंट्रोल असायचा. मनमोहन सिंग यांच्या काळात हा कंट्रोल आंतरराष्ट्रीय बाजाराकडे गेला आहे.’’ मात्र हे सांगतानाच त्यांनी बेरोजगारीबाबत उत्तर देणे टाळले. मध्यवर्ती निवडणुकांबाबत ते म्हणाले, ‘‘फक्त आणि फक्त आमदार निघून जाऊ नये, यासाठी या भीतीतून वारंवार बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच व्यासपीठावर चार आमदार देखील राहिलेले नाही. आमदार सोडा, गजानन किर्तीकरांसारखे नेते सोडून जात आहेत.’’

हे मुद्दे केले उपस्थित...

  • एकीकडे राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे तर दुसरीकडे कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. यात्रा नेत्यांनीच हायजॅक केली आहे.

  • अडीच वर्ष सत्ता असूनही कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही. राहुल यात्रेत येऊनही त्यांना काही फायदा होत नाही.

  • चित्रा वाघ यांच्या वक्तव्याबाबत, पत्रकारांच्या प्रश्नाला संयमानेच उत्तर दिले पाहिजे. असे प्रसंग होऊ नये.

  • जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला पाहिजे.

  • प्रभाग रचना २०११ नुसार करायला पाहिजे, ते चुकीचे काम महाविकास आघाडी सरकारने केले.

  • ओबीसींबाबत न्यायालयात याचिका आहे, त्यामुळे याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर किती लाखांचे कर्ज? पत्नीच्या नावावर आहे 1 कोटी 36 लाखांची मालमत्ता

Maharashtra Assembly Election 2024 : आलिशान वाहने वाढविणार उमेदवारांचा खर्च; निवडणूक शाखेकडून दरसूची तयार

विराटनं आता देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं! माजी सहकाऱ्याचा किंग कोहलीला सल्ला

Chhatrapati Sambhajinagar Crime : हवेत गोळ्या झाडण्याचे रील फेमस झालं अन् इंस्टावर राडा करणाऱ्या संभाजीनगरच्या राखी मुरमुरेला अटक...

खुर्चीवरून उठवलं, हात पकडला अन्... चक्क सासूबाईंसोबत डान्स करताना दिसला किंग खान; व्हिडिओ वायरल

SCROLL FOR NEXT