Chandrashekhar Bawankule statement Sanjay Raut political culture politics sakal
पुणे

Chandrashekhar Bawankule : संजय राऊत यांचे दररोजचे टोमणे बंद व्हायला पाहीजेत; चंद्रशेख बावनकुळे

सगळ्याच पक्षातील नेत्यांनी आपली राजकीय संस्कृती जोपासण्यास प्राधान्य द्यावे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संजय राऊत हे कारागृहातून बाहेर आल्यापासून त्यांच्या भाषेवर कारागृहाचा प्रभाव आहे. त्यांनी दररोज सकाळी उठून टोमणे मारण्याऐवजी स्वतःचे तोंड बंद ठेवावे. अजित पवार यांनी ते पदावर असताना कसे वागत होते, याचा पुर्वइतिहास तपासावा.

लोकांना टोमणे नव्हे, तर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विकासावर काम करावे, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली.

तसेच भाजपच्या किंवा विरोधी पक्षातील नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य करु नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जी 20 परिषदेच्या निमित्त भाजपकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतची माहिती देण्यासाठी बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांवर उत्तरे दिली. यावेळी राजेश पांडे, जी 20 समितीचे प्रदेश संयोजक राजेश पांडे, खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते.

संजय राऊत यांच्या शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिन्यात पडेल, या वक्तव्याबाबत बावनकुळे म्हणाले, ""राऊत यांनी दोन गोष्टी केल्या पाहिजेत. दररोज सकाळी उठून टोमणे मारण्याचे प्रकार आणि आणि कारागृहाचा प्रभाव असलेली त्यांची भाषा थांबविली पाहीजे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा माझ्या उपस्थितीत बुथपासून राज्यापर्यंत पक्षप्रवेश सुरु आहेत. संजय राऊत यांना त्यांचे उरलेले कार्यकर्ते, आमदार जाऊ नयेत, असे वाटत असल्याने त्यांना धीर देण्यासाठी ते सरकार पाडण्याची भाषा वापरत आहेत.

ते जगातील सर्वात विद्वान व्यक्ती आहेत. लोकांना टोमणे आवडत नाहीत. त्याऐवजी प्रभावी व प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत सुचना केल्या पाहिजेत.'' बाळासाहेबांची शिवसेना किंवा ठाकरे यांची शिवसेना याबाबतचा निकाल देण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे.

आपल्याला काय वाटते, यापेक्षा आयोगाची भुमिका काय असणार आहे हे महत्वाचे आहे. तर्कवितर्क काढण्यात अर्थ नाही, मात्र ज्यांच्या विरोधात निकाल जाईल, ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील, असे त्यांनी सांगितले

अजित पवार यांनी पुर्वइतिहास तपासावा

अजित पवार यांनी सभागृहातच आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे म्हणत आव्हान दिले आहे. त्यांनी कुठलीही आयुधे वापरावीत. मात्र, अजित पवार यांनी ते पदावर असताना आपण कसे वागलो, याचे जुने व्हिडीओ काढून पहावेत.

आपला पुर्वइतिहास तपासावा. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, आमच्या 12 आमदारांना बाहेर काढले, ते आमच्याशी कसे वागले, याचाही विचार करावा, अशी टिकाही त्यांनी केली

शरद पवार यांचा सन्मान राखला पाहीजे

राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये जवळीकता वाढत चालली असल्याचा प्रश्‍न बावनकुळे यांना विचारण्यात आला. तेव्हा, "एकमेकांना आदर देण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी राज्यासाठी आपले आयुष्य दिले आहे.

ते आपल्या समोर आल्यानंतर त्यांना मानसन्मान द्यायलाच पाहिजे. आम्ही एकमेकांशी राजकीय लढाई लढत असतो, परंतु वैयक्तीक आयुष्यात एकमेकांबद्दल आदर ठेवण्याचे काम आपण केले पाहीजे'' असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

Assembly Election Voting 2024 : मतदान केंद्रावर राडा नडला! मतदान संपण्याआधीच उमेदवाराला पोलिसांनी केली अटक

Jharkhand Exit Poll: झारखंडमध्ये भाजप आघाडीला बहुमत; काय सांगताएत एक्झिट पोल?

Paithan Assembly Constituency Voting : आडुळ येथे शांततेत मतदान राञी उशीरा पर्यंत रांगा...

SCROLL FOR NEXT