Chandukaka Jagtap Sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यात विद्यानगरी, वाघोली, भांबर्डे, तळेगाव शाळा चमकल्या

माजी आमदार स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त `संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा` स्पर्धेचा निकाल आज जाहीर.

श्रीकृष्ण नेवसे

सासवड, जि. पुणे - संत सोपानकाका सहकारी बँक व श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ वतीने व दोन्ही संस्थांचे संस्थापक तथा माजी आमदार स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त `संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा` स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला.

पुरंदर - हवेलीचे आमदार तथा बँकेचे अध्यक्ष संजय चंदुकाका जगताप यांनी ही माहिती दिली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील विद्यानगरी (ता.बारामती), वाघोली (ता. हवेली), भांबर्डे (ता. मुळशी) आणि तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) या शाळांनी जिल्हास्तरीय स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे.

आमदार श्री. जगताप म्हणाले., पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्हा व त्या - त्या तालुकापातळीवर ही स्पर्धा घेतली. त्यातून जिल्हा पातळीवर प्रत्येकी चार क्रमांकाच्या एकुण 20 शाळांना आणि तालुकापातळीवर तीन क्रमांकापर्यंत 171 शाळा बक्षिसपात्र ठरल्या. या बक्षिसपात्र शाळांना सुमारे 4 लाख 77 हजार रोख बक्षिस रक्कमेसह गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाल, श्रीफळ 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सासवडच्या अत्रे सांस्कृतिक भवनात चंदुकाकांच्या जयंतीदिनी सासवडला समारंभपूर्वक दिले जाणार आहे.

बक्षिस वितरण समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. इतरही मान्यवरांची उपस्थिती आहे., अशी माहिती योजना समन्वयक नंदकुमार सागर, सुधाकर जगदाळे, दिलीप साबणे, विश्वजीत आनंदे, वसंत ताकवले यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, रविंद्रपंत जगताप, अनिल उरवणे, कुंडलीक मेमाणे उपस्थित होते. जिल्हास्तरासाठी क्रमनिहाय दहा, सात, पाच हजार रुपये बक्षिस आहे. तालुकास्तरीय बक्षिस रक्कम क्रमनिहाय तीन, दोन व एक हजार रुपये आहे.

पुणे जिल्ह्यातील बक्षिसपात्र शाळा -

- पुणे जिल्हास्तरीय बक्षिसपात्र शाळा - प्रथम 4 क्रमांक

* विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यम शाळा (विद्यानगरी, ता.बारामती)

* भारतीय जैन संघटना माध्यमिक विद्यालय (वाघोली, ता. हवेली)

* संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र (भांबर्डे, ता. मुळशी)

* स्वा. सै. रायकुमार बी. गुजर प्रशाला (तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर)

- पुणे जिल्ह्यातील तालुकास्तरीय बक्षिसपात्र शाळा - प्रथम 3 क्रमांक

* मातोश्री सोनाबाई देडगे विद्यालय (रुळे, ता. वेल्हे)

* न्यू इंग्लिश स्कूल (विंझर, ता. वेल्हे)

* तोरणा सागर माध्यमिक विद्यालय (निवी, ता. वेल्हे)

* विद्या प्रतिष्ठान मराठी माध्य. शाळा (विद्यानगरी, बारामती)

* नवमहाराष्ट्र विद्यालय (पणदरे, ता. बारामती)

* न्यु इंग्लिश स्कूल (लोणी भापकर, ता. बारामती)

* श्री. योग माध्यमिक विद्यालय (बेटवाडी, ता. दौंड)

* आदर्श विद्यालय (वडगाव बांडे, ता. दौंड)

* राज्य राखीव पोलीस पब्लिक स्कूल (एसआरपी ग्रुप, ता. दौंड)

* श्री. शरदचंद्र विद्यालय (वडगांव घेनंद, ता. खेड)

* भैरवनाथ माध्यमिक विद्यालय (कुरुळी, ता. खेड)

* श्री. भैरवनाथ विद्यालय (वाकी बु., ता. खेड)

* संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र (भांबर्डे, ता. मुळशी)

* माध्यमिक विद्यालय (म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी)

* स्वामी विवेकानंद विद्यालय (असदे, ता.मुळशी)

* विद्याविकास मंदिर (निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर)

* जयमल्हार माध्य. विद्यालय (चिंचोली मोराची, ता.शिरुर)

* न्यू इंग्लिश स्कूल (भांबर्डे, ता. शिरुर)

* विघ्नहर विद्यालय (अोझर, ता.जुन्नर)

* चैतन्य विद्यालय (अोतुर, ता. जुन्नर)

* मधुकर काशिद विद्यालय (चिंचोली काशिद, ता.जुन्नर)

* श्री. वाकेश्वर विद्यालय (पेठ, ता.आंबेगाव)

* विद्याविकास मंदिर (अवसरी बु. ता. आंबेगाव)

* हिरकणी विद्यालय (गावडेवाडी, ता. आंबेगाव)

* भारतीय जैन संघटना माध्य. विद्यालय (वाघोली, ता.हवेली)

* शिवभूमी माध्य. विद्यालय (खेडशिवापूर, ता. हवेली)

* धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय (तुळापूर, ता. हवेली)

* कमल विद्यालय (बाभुळगाव, ता. इंदापूर)

* कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय (कुरवली, ता.इंदापूर)

* श्री.बाबीर विद्यालय (रुई, ता.इंदापूर)

* पुरंदर हायस्कूल (सासवड, ता.पुरंदर)

* जि.सो. जाधव विद्यालय (साकुर्डे, ता.पुरंदर)

* नामदेव शिंगाडे विद्यालय (गुरोळी, ता.पुरंदर)

* पसुरे माध्य. विद्यालय (पसुरे, ता.भोर)

* सरनौबत सिडोजी थोपटे विद्यालय (खानापूर, ता.भोर)

* अमृतराव माध्य. विद्यालय (येवळी सांगवी, ता.भोर)

* वसुबाई माध्य. विद्यालय (माळेगाव खु,, ता.मावळ)

* एकविरा विद्यालय (कार्ला, ता.मावळ)

* न्यू इंग्लिश स्कूल (वडगाव, ता.मावळ)

- पिंपरी चिंचवड शहर

* प्रेरणा माध्य. विद्यालय (लक्ष्मणनगर, थेरगाव)

* ज्ञानदिप विद्यालय (रुपीनगर, तकवडे)

* समता माध्य. विद्यालय (चक्रपणी वसाहत, भोसरी)

- पुणे शहर

* एच.एच.सी.पी. हायस्कूल (हुजूरपागा, लक्ष्मीरोड)

* साधना विद्यालय (हडपसर, पुणे)

* महिलाश्रम हायस्कूल व व्यावसायिक विभाग (पुणे)

`माजी आमदार स्व. चंदुकाका जगताप यांनी पतसंस्था, बँक, शिक्षण संस्था आणि इतर कित्येक संस्था स्थापन केल्या. त्यांच्या कामाच्या पध्दतीत पारदर्शकता, शिस्त, स्वच्छता, सुबकता होती. त्यामुळेच स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा त्यांच्या जयंतीदिनी यंदा प्रथमच घेत शाळांना प्रोत्साहन देण्याकरीता पारितोषिक वितरण करुन नवा उपक्रम हाती घेतला आहे.`

- संजय जगताप, आमदार - पुरंदर-हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT