CBSE sakal
पुणे

Changes in Curriculum : तिसरी, सहावीच्याच अभ्यासक्रमात बदल; ‘सीबीएसई’चे स्पष्टीकरण

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये केवळ इयत्ता तिसरी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात बदल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये केवळ इयत्ता तिसरी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात बदल केला आहे. याशिवाय इतर कोणत्याही वर्गाच्या कोणत्याही अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला नाही.

इतर सर्व इयत्तांसाठी जुना अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके असणार आहेत, असे ‘सीबीएसई’ने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मंडळाच्या या स्पष्टीकरणाने संलग्न शाळांमध्ये अभ्यासक्रमाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

‘सीबीएसई’ने सर्व संलग्न शाळांना नोटीस काढून इयत्ता तिसरी आणि सहावी व्यतिरिक्त सर्व इयत्तांसाठी जुनाच अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांतून शिकविणे सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ‘सीबीएसई’ला कळविले आहे की, इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार होत आहेत.

इयत्ता सहावीची सर्व पाठ्यपुस्तके जुलैअखेर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शाळांना नवीन अभ्यासक्रमाचे पालन करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षण २०२३’ हा स्वीकारला आहे. या आराखड्यात दिलेल्या शिफारशी शाळांनी अंमलात आणाव्यात.

मंडळाने इयत्ता नववी ते बारावीचा वार्षिक अभ्यासक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे. यात शिकण्याचे परिणाम, अध्यापनशास्त्रीय पद्धती आणि मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या अभ्यासकमानुसार शिकविणे शाळांना आवश्यक असल्याचे मंडळाने सांगितले.

पाठ्यपुस्तके विकसित करण्याची प्रक्रिया सुरू

सध्या इयत्ता तिसरी आणि सहावीचा नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच अभ्यासक्रम आणि त्यावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ‘सीबीएसई’ला १८ मार्च २०२४मध्ये कळविले होते.

नवीन शिक्षण पद्धतीला अनुसरून आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सहावीसाठी ब्रिज कोर्स आणि इयत्ता तिसरीसाठी संक्षिप्त मार्गदर्शक तत्त्वे ‘एनसीईआरटी’ने विकसित केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT