Ganeshotsav 2023 Sakal
पुणे

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त बुधवारपासून पुणे शहरात वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त बुधवार, २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गणेशोत्सवानिमित्त बुधवार, २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

१. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी स. गो. बर्वे चौक - जंगली महाराज रस्ता - टिळक चौक - टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. सिमला चौक - कामगार पुतळा चौक - शाहीर अमर शेख चौक - बोल्हाई चौकमार्गे नेहरू रस्त्याचा वापर करून ढोले पाटील चौक (सेव्हन लव्ह चौक) मार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा.

२. मोटार वाहनचालकांना गाडीतळ पुतळा ते शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगीर चौक आणि पुढे नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल. तसेच जिजामाता चौक ते फुटका बुरूज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्यापासून नदीपात्रातील रस्त्याने भिडे पूल जंक्शनवरून उजवीकडे वळून केळकर रस्ता - झेड ब्रिज जंक्शन डावीकडे वळून गरुड गणपती चौक उजवीकडे वळून टिळक चौकमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

३. लक्ष्मी रस्त्यावरील मोटार वाहनचालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे.

स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्यावरून हमजेखान चौकातून डावीकडून वळून महाराणा प्रताप रस्त्याने जावे.

४. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

१) बाजीराव रस्त्यावरील वाहनांनी अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजमार्गे गाडगीळ पुतळा चौकातून उजवीकडे वळून जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद - देवजीबाबा चौक उजवीकडे वळून हमजेखान चौकातून सरळ महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौक उजवीकडे वळून गोटीराम भैया चौक डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जावे.

२) बाजीराव रस्त्यावरील वाहनांनी अप्पा बळवंत चौक बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजमार्गे गाडगीळ पुतळा चौकातून उजवीकडे वळून संताजी घोरपडे रस्त्याने कुंभारवेस चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

नो पार्किंगबाबत

शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते बेलबाग चौक ते रामेश्वर चौकातून उजवीकडे वळून मंडई ते शनिपार चौक- उजवीकडे सेवा सदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक ते फुटका बुरूज चौक- जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंगसाठी मनाई राहील. आवश्यकता भासल्यास या मार्गांवर सर्व वाहनांना प्रवेशास मनाई राहील.

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीस बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

१. लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक)

- डुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी

- हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडे पेठ पोलिस चौकीपुढे शंकरशेठ रस्त्याने इच्छितस्थळी.

- सोन्या मारुती चौक डावीकडे वळून मिर्जा गालिब रस्ता जंक्शन उजवीकडे वळून मंडईतून डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे.

२. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (गाडगीळ पुतळा ते जेधे चौक)

- शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी स.गो. बर्वे चौक - जंगली महाराज रस्ता- टिळक चौक - टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. किंवा सिमला चौक- कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक - बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाता येईल.

- कुंभार वेस चौक- पवळे चौक- साततोटी चौक- देवजीबाबा चौक - हमजेखान चौक- महाराणा प्रताप रस्त्याने घोरपडे पेठ पोलिस चौकी- घोरपडे पेठ उद्यान- झगडे आळी ते शंकरशेठ रस्ता.

- वाहतुकीच्या परिस्थितीनुसार दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लाल महालपर्यंत सोडण्यात येतील. तेथून दुचाकी वाहनचालकांनी डावीकडे वळून फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी.

३. बेलबाग चौक ते रामेश्वर चौक सर्व वाहनांसाठी बंद राहील.

- शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या मिनी पीएमपी बसेस आणि इतर हलकी वाहने बेलबाग चौकातून सेवासदनमार्गे लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकातून टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने जातील.

- शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस स.गो.बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील.- शिवाजी रस्त्यावरून पुणे स्टेशन आणि हडपसरकडे जाणाऱ्या बसेस गाडगीळ पुतळा- कुंभारवेस- शाहीर अमर शेख चौक- बोल्हाई चौक- नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी.

४. बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक)

पूरम चौक - टिळक रस्त्याने टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक.

पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौकदरम्यान असलेल्या एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर टेलिफोन भवन ते पूरम चौकादरम्यान तात्पुरती दुहेरी वाहतूक करण्यात येईल.

५. टिळक रस्ता (मराठा चेंबर ते हिराबाग चौक)

जेधे चौक, नेहरू स्टेडियमसमोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक आणि हिराबाग चौक.

वाहतुकीस बंद असलेले इतर मार्ग :

- सिंहगड गॅरेज, घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक.

- दिनकर जवळकर पक्ष ते पायगुडे चौक

- सणस रस्ता- गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक

- गावकसाब मस्जिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी

- कोहिनूर चौक ते बाबाजान चौक

- जेधे प्रसाद रस्ता-पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक

नो पार्किंग-

- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता- जिजामाता चौक ते मंडई चौक.

- मंडई ते शनिपार चौक

- बाजीराव रस्ता शनिपार ते फुटका बुरूज

- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंत

गणेशोत्सवात २० सप्टेंबरपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरात पार्किंगसाठी निश्चित करण्यात आलेले वाहनतळ.

दुचाकीसाठी वाहनतळ -

- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग

- देसाई महाविद्यालय (पोलिसांच्या वाहनांसाठी)

- गोगटे प्रशाला

- स.प. महाविद्यालय

- शिवाजी मराठा विद्यालय

- नातूबाग

- सारसबाग, पेशवे पार्क

- हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक

- पाटील प्लाझा पार्किंग

- मित्रमंडळ सभागृह

- पर्वती ते दांडेकर पूल

- दांडेकर पूल ते गणेश मळा

- गणेश मळा ते राजाराम पूल

- विमलाबाई गरवारे हायस्कूल

- आपटे प्रशाला

- मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय

- एसएसपीएमएस महाविद्यालय

दुचाकी आणि मोटारींसाठी वाहनतळ

- शिवाजी आखाडा वाहनतळ

- हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ

- नदीपात्रालगत

- पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ

- नीलायम टॉकीज

- आबासाहेब गरवारे महाविद्यालय

- संजीवन वैद्यकीय महाविद्यालय

- फर्ग्युसन महाविद्यालय

- जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT