पुण्यात ग्रामपंचायतीसाठी पार पडलेली भरती प्रक्रिया बोगस असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात दोन कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. याचसोबत 14 ग्रामसेवकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात बोगस भर्ती झाल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये 22 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तर, 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देण्यात आली आहे. (Recruitment Scam in PMC)
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune ZP CEO) यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत नव्याने 20 गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व नोकरदारांना देखील मनपामध्ये समाविष्ट करून घेण्याचा आग्रह होत होता. त्यातील काही बाबी समोर येताना अधिकाऱ्यांना आकड्यांमध्ये तफावत आढळली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाली.
चौकशीदरम्यान मोठा खुलासा झालाय. यासंदर्भात एक अहवाल देखील सादर करण्यात आला. त्यामध्ये काही 17 वर्षांच्या खालील व्यक्तींनाही नोकरी देण्यात आली आहे. त्यामुळे कृषीसेवकर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.