marriage esakal
पुणे

Alandi Crime : नवरदेवाची फसवणूक! पहिले लग्न लपवून नवरीने केले दुसरे लग्न

नवरदेवाने लग्नाचे फोटो स्टेटसवर अपलोड केल्यावर गावाकडील नातेवाइकामुळे नवरी मुलगी आणि साथीदारांचा गैरप्रकार आला उघडकीस.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - पहिले लग्न झालेले असतानाही माहिती लपवून दुसरे लग्न केले आणि सोबत अडीच लाख रुपये नवरदेवाकडून घेतल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात नवऱ्या मुलीसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नवरदेवाने लग्नाचे फोटो स्टेटसवर अपलोड केल्यावर गावाकडील नातेवाइकामुळे नवरी मुलगी आणि साथीदारांचा हा गैरप्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी नवऱ्या मुलीसह दोन महिला आणि दोन पुरुषांवर अटकेची कारवाई केली. याप्रकरणी राहुल दशरथ कणसे (रा. त्रिवेणीनगर, तळवडे, ता.हवेली, पुणे) यांनी फिर्याद दिली.

याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरी मुलगी मुंबईतील विले पार्ले येथे राहत असून तिचा यापूर्वी सातारा जिल्ह्यातील दहिवडीमध्ये अन्य एका मुलाशी विवाह झाला होता. पहिला विवाह अस्तित्वात असल्याची माहिती लपवून नवरी मुलगी आणि मध्यस्थ असलेल्या पुण्यातील वाघोलीस्थित दोन पुरुष आणि दोन महिलांनी फिर्यादी कणसे यांच्याकडे त्यांच्या भावाच्या लग्नाकरिता स्थळ दाखवण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले.

लग्न आळंदीतील पोफळे मंगल कार्यालयात ४ जुलैला झाले. लग्न झाल्यावर तत्काळ आरोपींनी ठरलेल्या पैशांची मागणी केली. नाही दिले तर नवरी मुलगी ताब्यात देणार नाही, अशी धमकी फिर्यादी आणि त्यांच्या नवरदेव भावाला दिली. पैसे मिळाल्यावर नवरानवरीचे फोटो फिर्यादीने स्टेटसला ठेवले. तेव्हा गावाकडच्या नातेवाइकांनी या नवरीचे पहिले लग्न झाले असल्याचे कणसे यांना सांगितले.

अधिक चौकशी केली असता नवरीचे सातारा जिल्ह्यात दहीवडीमधे लग्न झाल्याचे कळाले. मग झाल्या प्रकाराबाबत आळंदी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली. सर्व आरोपींना अटक केल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

"कोण किशोर कुमार ?" आलियाच्या प्रश्नाने रणबीरला बसला धक्का ; म्हणाला...

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर पोहोचले वर्षा बंगल्यावर, राजकीय चर्चांना उधाण

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

SCROLL FOR NEXT