Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal Corporation : अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या फाइल टेबलावर पडून

महापालिका वर्ग एक ते तीन गटातील अधिकाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे आवश्‍यक असते. मात्र, ही केवळ औपचारिकता राहिल्याने व या मालमत्तेची कोणीही उलट तपासणी करत नसल्याने कायद्याचा धाक राहिलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिका वर्ग एक ते तीन गटातील अधिकाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे आवश्‍यक असते. मात्र, ही केवळ औपचारिकता राहिल्याने व या मालमत्तेची कोणीही उलट तपासणी करत नसल्याने कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यातच आता वर्ग एकच्या काही अधिकाऱ्याच्या मालमत्ता विवरणाच्या फाइल प्रशासनाकडे जमा झालेल्या नाहीत, त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पडून आहेत. या अधिकाऱ्यांनी त्वरित फाइल मजा करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या सेवेत सुमारे वर्ग एक ते वर्ग चारमध्ये २० हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिका अधिनियमानुसार महापालिकेच्या वर्ग १ ते ३ ऱ्या गटातील सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. यातून केवळ वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागाकडे हा अहवाल जमा करणे आवश्‍यक आहे. पण काही अधिकारी मालमत्तेचा तपशील मांडत नसल्याचे समोर आले आहे.

विशेषतः यामध्ये वर्ग एकमधील अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. वर्ग दोन आणि तीन मधील कर्मचाऱ्यांनी ही माहिती सादर केली आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी मालमत्ता विवरणाचा आढावा घेतला असता त्यामध्ये वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची उदासीनता समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचे मालमत्ता विवरणपत्रे संबंधित अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून आयुक्तांकडे सादर होणे आवश्‍यक आहे. पण याचा आढावा घेतला असता वर्ग एकचे अधिकारी ज्या विभागात कार्यरत होते, त्याच विभागात बंद पाकिटे आजदेखील पडून आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या आस्थापना विभागाकडे अद्याप हे विवरणपत्रक आलेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे महानगरपालिका अधिनिमयाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल याची नोंद द्या, असा इशारा बिनवडे यांनी परिपत्रकातून दिला आहे.

महापालिकेतील सध्याचे मनुष्यबळ (काही प्रमाणात आकडे बदलतील)

श्रेणी - सध्या कार्यरत

  • वर्ग एक - ९६

  • वर्ग दोन - ३४६

  • वर्ग तीन - ४१४१

  • वर्ग चार - ८९८५

  • सफाई कर्मचारी - ७२३८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT