Yasin Attar Sakal
पुणे

Pune News : आचारी यासिन अत्तार असे झाले वारकरी?

वारीला येत असताना पकवाज वाजवायला शिकलो आणि आता देहू, आळंदी ते पंढरपूर या वारीच्या प्रवासात पकवाज वाजवत वारकरी झालो'.

समाधान काटे

पुणे - 'पोटाची खळगी भरण्यासाठी काही मानधनावर आचारी म्हणून सुरवातीला वारीला जात होतो. दरवर्षी एक महिन्याचा काळ वारीत जात असल्याने भजन, किर्तन, अभंग, भारूड या गोष्टींची ओढ लागली. सलग चार - पाच वर्षे वारीला गेल्यावर किर्तन, भजन देखील करू लागलो. मी कलाकार असल्याने मला तोंडाने अनेक आवाज काढता येतात. विहिरीवरील इंजिन, सायकल पंप, ढोलकी, आगगाडी असे आवाज काढतो.

वारीला येत असताना पकवाज वाजवायला शिकलो आणि आता देहू, आळंदी ते पंढरपूर या वारीच्या प्रवासात पकवाज वाजवत वारकरी झालो'. असे सांगत होते वाखरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील वारकरी यासिन अत्तार विठ्ठल सेवा मंडळ, खेड ब्रुद्रुक येथील दिंडी नंबर १०० मध्ये मागील २४ वर्षापासून सहभागी असलेले यासिन अत्तार वारीसोबतच पुण्यातील गोपाळकृष्ण विकास मंडळ, गोखलेनगर येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांनी आचारी ते पखवाज वादकांपर्यतचा प्रवास सांगितला.

वारकरी अत्तार यांनी सांगितले की, "हिंदू आणि मुस्लिम यांचे रक्त सारखेच आहे. सगळेजण एकसारखे अन्न खातात, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून, आमचे रक्त हिरवे नाही. राम- रहीम एकच आहे हे आपल्या पुर्वजांनी लिहून ठेवले आहे. गावाकडे देखील आम्ही दिवाळी, दसरा, पोळा, रमजान ईद असे सर्व सण साजरा करतो यासह नमाज पाडणे, कुरान वाचणे चालू असते. घराच्या आसपास कोण मयत झाले असेल तर माझी पत्नी तीन दिवस त्यांना भाकरी,भाजी देत असते, गावातील वातावरण खेळीमेळीचे असते.

वारीत उत्साह असतो, घरची आठवण देखील येत नाही. वारी झाल्यावर आपापल्या घरी जाताना अश्रू अनावर होतात. जसं की माहेरून नांदायला जातोय असंच वाटतं. हिंदू- मुस्लिम नागरिकांनी बंधूभाव जपून राहवे. वारीला जात असताना ऊन्हात खूप गरम होते. पाऊस पडला तर मोठा आधार मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : मतदारांवर प्रभाव टाकणारा राजकीय प्रचार केल्यास होणार कारवाई

SCROLL FOR NEXT