Chemically polluted sewage started flowing into nala 
पुणे

रसायनमिश्रीत प्रदुषित सांडपाणी ओढयाला वाहण्यास सुरू

कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी परिसरात सोडल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित

सावता नवले

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्या दरवर्षी शेतकऱ्यांसारख्या पावसाची आतूरतेने वाट पाहत असतात फरक ऐवढाच शेतकरी पाणी मिळण्यासाठी तर कंपन्या साठून ठेवलेले रसायनमिश्रीत सांडपाणी पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी. उन्हाळ्यात काही दिवस बंद असलेला रसायनमिश्रीत प्रदुषित सांडपाण्याचा पाट पुन्हा ओढयाला वाहण्यास सुरू झाला आहे.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही राज्यातील केमिकल झोन म्हणून ओळखली जाते. या वसाहतीची उभारणी 1990 च्या सुमारास सुरू झाली. या वसाहतीची उंची समुद्र सपाटीपासून जास्त असल्याने परिसरात केमिकल झोन करण्यास शासनाच्या काही विभागांचा विरोध होता. मात्र राजकीय इच्छाशक्तीमुळे या विरोधाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

वसाहतीत रासायनिक कंपन्या चालू करण्यापूर्वी त्यांनी वैयक्तिक सांडपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणे व शासनाकडून वसाहतीत सामायिक सांडपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणे नियमानुसार बंधनकारक होते. मात्र हे सर्व प्रदुषणाचे नियम धाब्यावर बसून कंपन्यांनी रासायनिक उत्पादने सुरू केली होती. कंपन्यांकडून रासायनिक सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता परिसरात सोडून दिल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित झाले.

रसायनमिश्रीत पाण्याने शेती उध्वस्त व पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्याने स्थानिकांनी उपोषण, रास्ता रोको इत्यादी मार्गाने आंदोलने केली. त्यानंतर प्रदुषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ व प्रशासनाला जाग येऊन कंपन्यांनी वैयक्तिक व सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यास सुरवात केली. त्यानंतर सामायिक सांडपाणी केंद्रात सुधारणा करण्यात आली. मात्र प्रदुषण काही कमी झाले नाही. सांडपाणी केंद्राचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपन्यांनी संस्थेची स्थापना केली. काही प्रमाणात प्रदुषित सांडपाणी सोडणे कमी झाले. मात्र पूर्णपणे बंद होऊ शकले नाही.

आजही अनेक कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येणारा भरमसाठ खर्च टाळण्यासाठी परिसरात सोडतात. गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीत सोडण्यात येणारे रसायनमिश्रीत सांडपाणी मातीचा बांध घालून आडविले. त्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्त्यावर मोठयाप्रमाणात सांडपाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासन व संबंधित विभाग खडबडून जागे होऊन सांडपाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले होते. तर उन्हाळ्यात काही दिवस सांडपाणी ओढयाला जाणे बंद झाले होते. मात्र पावसाळा सुरू झाला आणि पावसाच्या पाण्यात रसायनमिश्रीत सांडपाणी ओढयाला सोडण्यास सुरवात झाल्याने ठिकठिकाणी पाण्यावर फेस व उग्रवास येऊ लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT