Chhatrapati Sambhaji Jeevan and Balidan sakal
पुणे

Chhatrapati Sambhaji Book : ‘छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान’ कादंबरी सर्वत्र उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ प्रकाशन’ प्रकाशित आणि लेखिका मेधा देशमुख भास्करन यांची ‘छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान'' ही कादंबरी पुस्तक विक्रेत्यांकडे आणि amazon.in वर उपलब्ध झाली आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी ऐतिहासिक दाखल्यांबरोबर वास्तविकतेचे भान देणारी आहे. लेखिका मेधा देशमुख भास्करन यांच्या लाइफ अँड डेथ ऑफ संभाजी’ या इंग्लिश कादंबरीचा मराठी अनुवाद नंदिनी उपाध्ये यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ६ जून रोजी ३५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने ज्या स्वराज्य रक्षणासाठी संभाजी महाराजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटत ठेवले, त्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारी ही कादंबरी प्रकाशित झाली असून ती महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहे. अशा ऐतिहासिक कादंबरीमधून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा वास्तवदर्शी जीवनप्रवास मांडण्याचा ‘सकाळ प्रकाशना’चा प्रयत्न आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे, रयतेचे राज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्या स्वराज्य उभारणीच्या कार्याची जबाबदारी संभाजी राजांवर अजाणत्या वयापासूनच येऊन पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य सेनेसह बादशहा औरंगजेब दक्षिणेवर चाल करून आला.

शिवाजी महाराजांवरही अशा तऱ्हेने प्रचंड मोठ्या मोगल सैन्याशी दोन हात करण्याची वेळ आली नव्हती. त्याचवेळी पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी, डच, फ्रेंच यांच्याबरोबरही त्यांना युद्ध करावे लागले. यातून लष्करी व्यूहरचनाकर, अपराजित योद्धा असलेले संभाजीराजे समोर येतात.

अजाणत्या वयात स्वीकारावी लागलेली मोगल साम्राज्याची मनसबदारी, त्यानंतर आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांबरोबर झालेली नजरकैद, काटेरी मुकुट ठरलेले त्यांचे ‘छत्रपती’पद ते स्वराज्यरक्षणासाठी दिलेले बलिदान अशा अविश्वसनीय घटनांनी संभाजी राजांचा जीवनपट व्यापलेला आहे. त्यातून संभाजी राजांच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यामिश्र पैलू समोर येतात.

मेधा देशमुख-भास्करन या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असून ऐतिहासिक कादंबरीकार तसेच विशेषत: चरित्र-लेखनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र असलेल्या ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’ या त्यांच्या इंग्रजी पुस्तकाला रेमंड क्रॉसवर्ड बुकतर्फे चरित्र लेखनासाठीचे मानांकन मिळाले होते.

‘सकाळ प्रकाशन’ने ‘द स्टोरी ऑफ इम्युनिटी’ आणि ‘अप अगेन्ट डार्कनेस’ ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. पुस्तक महाराष्ट्रासह , गोवा आणि बेळगाव येथील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे आणि amazon.in वर उपलब्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ८८८८८४९०५०.

पुस्तकाचे नाव : छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान

प्रकाशक : सकाळ प्रकाशन

लेखिका : मेधा देशमुख भास्करन

पृष्ठे : ४६६ किंमत : ५९९ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT