३५५ वा आग्र्याहून सुटका स्मृतीदिन Sakal
पुणे

आग्र्याहून सुटकेची ३५५ वर्षे; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला राजगड

स्मृती दिन किल्ले राजगडावर दिमाखात साजरा

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे, (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज कि जय ,जय भवानी जय शिवाजीचा जयघोष, ढोल ताशांचा गजर,शाहीरी पोवाड्याने शिवकाळ जागा होत किल्ले राजगडचा आसमंत दुमदुमून गेला.

छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटले त्यांनी गरुडझेप घेत किल्ले राजगडावर थेट पोहचले हा प्रसंग साधासुधा नसून छत्रपती शिवरायांच्या स्वराजाला कलाटणी देणारा प्रसंग होता. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून निसटून महाराजांचा पुनर्जन्मच होता. ३५५ व्या आग्रा सुटका स्मृतीदिन प्रसंगाचे औचित्य साधून श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ , पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवार (ता.१२) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर करण्यात आले होते. कार्यक्रमाचे हे ४१वे वर्ष होते.

राजगड पायथ्याशी असलेल्या खंडोबाच्या माळावरती शनिवार(ता. ११) रोजी ढोल ताश्यांच्या गजरात उत्सवास सुरवात झाली. शिव व्याख्याते संदीप तापकीर यांचे व्याख्यान झाले, शिव शाहीर श्रीकांत रेणके, श्रीकांत शिर्के व आविष्कार देशिंगे आदी कलाकारांनी पोवाडा साजर केला .

ज्ञानप्रबोधिनीच्या युवा मंचाने सदर केलेले ‘बर्ची नृत्य’ लक्षणीय होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव प्रसादे , वसंत पाळंदे, एकनाथ दर्डिगे , नाना शिर्के ,पोलीस पाटील योगेश दर्डिगे , लक्ष्मण करंजकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तर रविवारी सकाळी ६. वा. राजगड किल्यावर पद्मावती देवीचे पूजन करून ध्वजारोहण गडकरी सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. पाली दरवाजा ते पद्मावती मंदिरा पर्यंत ढोल ताश्याच्या गजरात भंडारा उधळत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली.

आकर्षक अश्या फुलांच्या तोरण माळांनी किल्यांचे दरवाजे सजविण्यात आले होते. रांगोळी तसेच शिस्तबद्ध वादन करत छत्रपती शिवाजी महाराज कि जय अश्या जयघोषात देत असंख्य शिवप्रेमी च्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सिद्धार्थ पारखे व लहान मावळे वेशभूषेत अधीराज धावडे व वज्रराज धावडे होते. या कार्यक्रमास शिवसेनेचे रमेश कोंडे अतुल दांगट, राहुल पायगुडे, राहुल नलावडे उपस्थित होते.

या उत्सवाचे आयोजक सुर्यकांत भोसले, संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, समीर रुपदे, सतीश सोरटे, मंगेश राव, योगेंद्र भालेराव, अमोल व्यवहारे, शशी रसाळ, सुनील तोंडे, अभिजित पायगुडे, गुरुदत्त भागवत, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे, जगदीश कदम, नचिकेत कदम , गणेश बोरकर सचिन गोळे, निलेश बारावकर, रश्मी अनिल मते, नयना ठाकूर तसेच मंडळाचे कार्यकर्ते व असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT