Eknath Shinde  Sakal
पुणे

मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्यकर्त्याच्या आग्रह करता बोटीने प्रवास करत मुख्यमंत्री डोंबिवली आले, लावली दहीहंडीला हजेरी.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : शिंदे समर्थक आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री साडे अकरा सुमारास हेजरी लावत उपस्थित असलेल्याना  मार्गदर्शन केले, यावेळी त्यांनी सर्वसामान्य न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांचं सगळ्यांचं सरकार आहे मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी पिंपळास ते मोठागाव असा बोटीने प्रवास करून आणि डोंबिवलीची खाडी पार करून दीपेश म्हात्रे यांच्या हंडीला आले,यावेळी माजी महापौर पुडलीक म्हात्रे आणि शहरप्रमुख राजेश मोरे पण उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री डोंबिवली पश्चिमेतील हंडीला हजेरी लावत कार्यकर्त्यांची आणि उपस्थित नागरिकांची मने जिंकली विशेष म्हणजे त्यांनी भिवंडी येथील पिंपळास ते डोंबिवली पश्चिम येथील मोठा येथे खाडी प्रवास केला आणि सम्राट चौकातील हंडीला हजेरी लावली.यावेळी कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की सरकार तुमच्या सगळ्यांच सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, शिवसेना भाजपा युतीचा सरकार आहे. बाळासाहेबांचा विचारांचा सरकार आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा सरकार आहे, म्हणून प्रत्येकाला वाटते हे माझं सरकार आहे,आपलं सरकार आहे.हीच बाब गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळत असून अनुभवला मिळत आहे, ही चांगली बाब आहे. सर्वसामान्य न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांचं सगळ्यांचं सरकार आहे, मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात.

आपण या गोविंदा मध्ये निर्णय घेतला असून दहा लाखाचा विम्याची घोषणा सरकारने केली. त्याचबरोबर पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डी प्रमाणे प्रो गोविंदा सुरू होणार यावर्षी आपण सार्वजनिक सुट्टी पण जाहीर केली होती. कुठलाही गोविंदला इजा झाली, दुखापत झाली, अपघात झाला तर त्याच्या संपूर्ण खर्च सरकार विनामूल्य ट्रीटमेंट करणारा निर्णय घेतला आहे.तसेच शिंदे यांनी बोटीचा प्रवासा बद्दल सांगितले की बोट चांगली होती सुरक्षितपणे आलेलो आहे या ठिकाणी पोहोचलोय खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावच लागतं. यावेळी माजी नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी भावुक होऊन सांगितले की सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा, हे आज मुख्यमंत्री साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कार्यकर्त्यांची मन जपण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्याही थराला जाऊ शकतात.कार्यकर्त्यांच आणि गोविंदा पथकांच मन जपण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज डोंबिवलीत हाजिरी लावली. खूप कष्ट करणारे सर्व सामन्याचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी हे सिद्ध केलं डोंबिवली मध्ये हजेरी लावून असे म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT