Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : खंडणीसाठी अपहृत मुलाची लोणावळ्यातून सुखरूप सुटका ; भाडेकरूनेच कृत्य केल्याचे तपासात उघड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाळेत जाणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून ७० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका केली आहे. अपहरण करणारा तरुण हा मुलाच्या वडिलांचा भाडेकरू असल्याचे समोर आले आहे.

अपहरण झालेला मुलगा कात्रजमधील संतोषनगर परिसरात राहायला आहे. सोमवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकावरून आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

मुलाला जिवंत बघायचे असेल तर त्वरित पैसे पाठवा, अशी धमकी अपहरणकर्त्याने दिली. पोलिसांकडे तक्रार करू नका. पैसे दिल्यानंतर तासाभरात मुलाला सोडण्यात येईल, अशी धमकी त्याने दिली. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात तरुण लोणावळ्यात असल्याचे निष्पन्न झाले. मध्यरात्री पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहचले. त्यांनी मुलाची सुटका केली असून त्याला पुण्यात आणले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT