Pimpri-Chinchwad Municipal Corporation sakal
पुणे

Pune News : जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ; मतदारांची संख्या सहा लाखांच्या घरात, ‘कॅंटोन्मेंट’ सर्वांत लहान

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा तर, कॅंटोन्मेंट मतदारसंघ सर्वांत लहान विधानसभा मतदारसंघ ठरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा तर, कॅंटोन्मेंट मतदारसंघ सर्वांत लहान विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. चिंचवडमधील एकूण मतदारांची संख्या आता ५ लाख ९५ हजार ४०८ इतकी झाली आहे. कॅँटोन्मेंटमधील एकूण मतदारांची संख्या ही २ लाख ६९ हजार ५८८ इतकी आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (ता.२३) जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभानिहाय एकूण मतदारांची संख्या देण्यात आली आहे. या यादीतील मतदारांच्या आकडेवारीवरून चिंचवड हा जिल्ह्यात सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २१ पैकी १४ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, उर्वरित सात विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

मतदारांची संख्या वाढलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हडपसर, खडकवासला, कोथरूड, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड आणि शिरूर आदींचा तर, मतदार संख्या कमी झालेल्या मतदारसंघांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड, कसबा, कँटोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. सर्वाधिक ११ हजार ३० मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघात वाढले आहेत. याशिवाय सर्वाधिक ५ हजार ६१ मतदार हे दौंड विधानसभा मतदारसंघात कमी झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये ४२ लाख ४४ हजार ३१४ पुरुष, ३८ लाख ८२ हजार १० महिला तर, ७९५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

‘विधानसभा’निहाय एकूण मतदार

  • - जुन्नर --- ३ लाख ८ हजार ४३९

  • - आंबेगाव --- २ लाख ९८ हजार ५९८

  • - राजगुरुनगर (खेड) --- ३ लाख ४५ हजार ३५

  • - शिरूर --- ४ लाख २९ हजार ८१८

  • - दौंड --- २ लाख ९९ हजार २६०

  • - इंदापूर --- ३ लाख १८ हजार ९२४

  • - बारामती --- ३ लाख ६४ हजार ४०

  • - पुरंदर --- ४ लाख १४ हजार ६९०

  • - भोर --- ३ लाख ९७ हजार ८४५

  • - मावळ --- ३ लाख ६७ हजार ७७९

  • - चिंचवड --- ५ लाख ९५ हजार ४०८

  • - पिंपरी --- ३ लाख ६४ हजार ८०६

  • - भोसरी --- ५ लाख ३५ हजार ६६६

  • - वडगाव शेरी --- ४ लाख ५२ हजार ६२८

  • - शिवाजीनगर --- २ लाख ७२ हजार ७९८

  • - कोथरूड --- ४ लाख १ हजार ४१९

  • - खडकवासला --- ५ लाख २१ हजार २०९

  • - पर्वती --- ३ लाख ३४ हजार १३६

  • - हडपसर --- ५ लाख ६२ हजार १८६

  • - पुणे कॅंटोन्मेंट --- २ लाख ६९ हजार ५८८

  • - कसबा पेठ --- २ लाख ७२ हजार ७४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT