जगातील सर्वोत्तम इंस्टिट्यूट मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये पुण्याच्या चिराग फलोरने प्रवेश मिळवला आहे. खरं तर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये अॅडमिशन मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट मानली जाते. पण म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे? पुण्याच्या चिरागने जेईई Entrance Examination (JEE) परीक्षेत 12 वा क्रमांक पटकावला आहे. आणि त्याचबरोबर जगातील सर्वोत्तम इंस्टिट्यूट मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये प्रवेश देखील मिळवला आहे.
एमआयटीसारख्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही चिरागने अनुभव घेण्यासाठी म्हणून JEE परिक्षा दिली होती.
तो म्हणाला की,
मी IITच्या प्रवेश परीक्षेची तयारी गेल्या चार वर्षांपासून करत होतो. आणि म्हणून त्या परिक्षेला सामोरे जाण्याची माझी इच्छा होती. मी हे खात्रीने सांगू शकतो की, IITची प्रवेश परीक्षा ही सर्वात कठीण असते. MIT प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार करुन त्याला उपलब्ध असलेल्या संधीचा त्याने किती फायदा घेतला आहे, हे बघतात. तर आयआयटी प्रवेशाचे निकष हे संपूर्णपणे वेगळे आहेत. MITच्या प्रवेशासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व आणि पार्श्वभूमी याला अनुसरुन काही निबंध लिहायचे असतात. तर IIT च्या प्रवेश परिक्षेसाठी भली मोठी तयारी करावी लागते.
जानेवारीत पार पडलेल्या JEE परीक्षेत चिरागला ९९.९८९७ टक्के मिळाले होते. त्याने सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि 100 टक्के मिळवून 12 वा क्रमांक मिळवला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चिरागला अद्याप अमेरिकेचा व्हिसा उपलब्ध होऊ शकला नाहीये. सध्या तो ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून MIT त शिकतो आहे. अमेरिकेतील हे ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे रात्री ३ वाजता हे क्लासेस संपतात. तो दिवसा झोपत असून 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या JEE Advanced परीक्षेची तयारीही करतो आहे.
इंटरनॅशनल ऑलंपियाड (International Olympiads) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल त्याला बाल शक्ती पुरस्कारदेखील मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिरागला सन्मानित करुन त्याचं कौतुकदेखील केलं होतं.
चिरागला भविष्यात खगोलभौतिकशास्त्रात संशोधन करायचे आहे. त्याला पहिल्यापासूनच अवकाशातील चांदण्या पाहण्याचा छंद आहे. 12 वी मध्ये चिरागला CBSE मधून 98.4 टक्के प्राप्त झाले होते. चिरागचे वडील हे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.