chitalebandhu mithaiwales bakarwadi history and its gujarati connection esakal
पुणे

चितळेंना बाकरवडीची रेसिपी एका 'गुजराती' माणसाने सांगितलेली

Bhushan Tare भूषण टारे

बाहेरून पुण्याला भेट द्यायला येणाऱ्या पाहुणे मंडळीचा प्रोग्रॅम ठरलेला असतो. शनवारवाड्याला भेट देणे, कात्रज प्राणिसंग्रहालयात पोराबाळांना फिरवून आणणे, महिलावर्गाची तुळशी बागेत- लक्ष्मीरोडला खरेदी करणे. या सगळ्या धामधुमीमध्ये पुण्याचे पाहुणे एक गोष्ट न चुकता करतात. चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या दुकानात रांगेत उभं राहून बाकरवडी विकत घेणे. या खरेदीनंतर चितळे कसं दुपारी १ ते ४ बंद असतं त्यावरून वर्षानुवर्षे चालत आलेले जोक पून्हा रिपीट करणे ओघाने आलंच. खरं तर आता बाकरवडी दुपारी सुद्धा मिळते, पुणेकरांबरोबरच सातासमुद्रापारच्या एनआरआय लोकांची सुद्धा लाडकी झालीय. पण पुणे आणि चितळेंची बाकरवडी, १ ते ४ वाले जोक हे गणित काय संपत नाही.

या सगळ्यात मुख्य प्रश्न राहतो की चितळेंचा ब्रँड एवढा पॉप्युलर करणारी बाकरवडी आली कुठून ?

चितळे उद्योगसमूहाचा इतिहास

आज सातासमुद्रापार पोहचलेल्या चितळे उद्योगाच्या वटवृक्षाचे मूळपुरुष म्हणजे भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे. मूळचे सातारा जिल्ह्यातल्या लिंबगोवा या खेड्यातले. मुख्य व्यवसाय दुधाचा. तेव्हाच्या काळात त्यांच्याकडे तब्बल ६०० म्हशी होत्या. या म्हशींच दूध ते पुण्याला विक्रीला आणायचे. व्यवसाय त्यांचा चालला होता पण खर्च व नफ्याचं गणित साध्य होतं नव्हतं. अशातच आलेल्या साथीच्या रोगाने व्यवसायाचा बोजवारा उडवून लावला. मुख्य प्रश्न जनावरांच्या पाण्याचा होता. कृष्णेचं भरपूर पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी सुपीक जमीन याच्या शोधात भास्कर चितळे आणि जानकीबाई चितळे हे दाम्पत्य सांगली जिल्ह्यातील भिलवडी या गावात आलं आणि तिथलंच होऊन राहिलं.

साल असावं १९३६. मूळची कष्टाळू वृत्ती, अंगात असलेली सचोटी आणि अफाट संघर्ष याच्या जोरावर या दाम्पत्याने चितळे उद्योगाची पायाभरणी केली. ‘कष्ट, सातत्य आणि सचोटी’ हेच संस्कार त्यांनी पिढीला देखील दिले. यातूनच भाऊसाहेब चितळेंच्या थोरल्या सुपुत्राने म्हणजेच रघुनाथराव चितळे यांनी पुण्यात पहिल्यांदा ‘चितळे डेअरी’ स्थापन केली. त्यानंतर मग ‘शिवसंतोष दुग्धालय’. चितळेंच्या दुधाची ख्याती त्याही काळात प्रचंड फेमस झाली. चितळेंच भिलवडीवरून येणारं दूध आणि खास आटवून बनवलेली बासुंदी, इतर दुग्धजन्य पदार्थ पुणेकरांच्या आवडीचे बनले. यातूनच रघुनाथरावांना पुढची आयडिया सुचली ती म्हणजे मिठाईच्या दुकानाची.

chitale family history

चितळे बंधू मिठाई

१९५४ साली रघुनाथराव उर्फ भाऊसाहेब चितळे आणि त्याच्या एसपी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धाकट्या भावाने म्हणजेच नरसिंह उर्फ राजाभाऊ चितळे यांनी पुण्याच्या डेक्कन जिमखाना येथे चितळे बंधू मिठाईवाले हे दुकान सुरु केलं. त्याकाळात त्यांच्या दुकानात फक्त दोन माणसे कामाला होती. दूधवाटपापासून इतर सारी कामे स्वतः चितळेबंधू करायचे. व्यवसाय सुरू केल्यापासून किमान ८ ते १० वर्षे त्यांना फायदा काही झालानाही. तरीही आपण करतो त्या व्यवसायाचा दर्जा जपण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. पुण्यात रघुनाथराव चितळे आणि राजाभाऊ चितळे तर भिलवडीला दत्तात्रेय चितळे आणि परशुरामभाऊ चितळेंनी जोमानं काम करत होते. एकत्र कुटूंब झोकून देऊन कष्ट उपसत होतं.

चितळेंच्या मिठाईच्या दुकानात ताज्या श्रीखंडापासून ते फरसाण, शेव व इतर चटपटीत पदार्थ मिळायचे. त्यांच्या आंबावडीची चांगली विक्री व्हायची पण म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं. एकदा रघुनाथराव चितळे व्यवसायाच्या निमित्तानं गुजरात दौऱ्यावर गेले होते. उपजत चौकस बुद्धी होती. बाहेरच्या गावात मिठाईच्या दुकानात काय विकलं जातं, लोकांना काय आवडतं याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. अशातच त्यांना गुजरातमधल्या एका दुकानात एक खमंग पदार्थ दिसला. त्यांनी तिथल्या दुकानदाराला त्याची रेसिपी विचारली. हीच ती आपली बाकरवडी.

चितळे बाकरवडीचा इतिहास

चितळेंच्या चौथ्या पिढीचे शिलेदार इंद्रनील चितळे हे स्क्रोल या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये सांगतात,

१९७० मध्ये गुजरातमधील एका व्यक्तीने भाऊसाहेबांची बाकरवडीशी ओळख करून दिली. पण गुजराती रेसिपी अधिक गोडहोती. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रीयन चवीनुसार रेसिपीमध्ये आणखी मसाला टाकण्याचाविचार केला.”

नागपूरमध्ये सुद्धा बाकरवडीचा भाऊ म्हणता येईल अशा पुडाच्या वड्या बनवल्या जायच्या. त्या प्रचंड तिखट असायच्या. राजाभाऊ चितळेंना नागपूरमधल्या एका शेजाऱ्याने पुडाची वडी कशी बनवायची ते शिकवलं. हीच पुडाची वडी आणि गुजराती बाकरवडी एकत्र करून तयार झाली चितळेंची बाकरवडी.

chitale bandhu mithaiwale deccan gymkhana shop history

पुणेकरांनो, लस घेताय? मग, थेट चितळेंकडून मिळणार बाकरवडी भेटबाकरवडी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचे आगमन

सुरवातीला भाऊसाहेब चितळेंची पत्नी विजया आणि राजाभाऊंची पत्नी मंगला या दोघीच बाकरवड्या बनवायच्या. दर्जामध्ये कधीही तडजोड करायची नाही हे सूत्र या दोघींनी बाकरवडी बनवताना देखील पाळलं. लोकांना या गुजराती पदार्थाचा मराठी अवतार प्रचंड आवडला. साधारण १९७६ साली चितळेंच्या बाकरवडीने पुण्यात पाय रोवला आणि त्यानंतर परत कधी मागे वळून देखील पाहिलं नाही. चितळेंची ओळख म्हणजे सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची व प्रयोग करत राहण्याची वृत्ती. राजाभाऊ चितळेंनी पुण्यात पहिल्यांदा पिशव्यांद्वारे दूधविक्रीस सुरवात केली. चितळे बंधूनी परदेशात जाऊन नवनवीन तंत्रज्ञान आपल्या व्यवसायात आणलं. पाश्चराइज्ड दुधाचा प्रयोग देखील त्यांचा यशस्वी झाला. म्हशींना खाद्य देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा जगातला पहिला सुसज्ज गोठा हा चितळे बंधूंचा होता.

ऐंशीचं दशक उलटेपर्यंत दूधासोबतच बाकरवडी ही चितळेंची ओळख बनली होती. एका छोट्या फॅक्टरीमध्ये कामगारांच्या साहाय्याने मॅन्युअली ३०० किलो बाकरवडी तोपर्यंत बनत होती.मात्र रघुनाथराव चितळेंनी आपल्या युरोप दौऱ्यात हॉलंडमधील मशिनरी पाहिली. तिचा वापर बाकरवडी बनवण्याच्या कामात करता येऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. जवळपास ४ वर्षे ते जर्मनी आणि हॉलंडच्या टेक्निशयन्सचा पाठपुरावा करत होते. यातूनच तयार झालेल्या मशीनवर १९८९ साली पहिल्यांदा बाकरवडीची सेमिऑटोमेटेड निर्मिती सुरु झाली. १९९२ साली बाकरवडीच्या निर्मितीमध्ये संपूर्ण ऑटोमेशनचा टप्पा चितळेंनी गाठला. या सगळ्या प्रक्रियेत बाकरवडीची चव मात्र त्यांनी जराही बदलू दिली नाही. तेव्हापासून आजपर्यंत चितळेंचीच नाही तर संपूर्ण पुण्याला बाकरवडीने वेगळी ओळख बनवून दिलीय. इतकंच काय गुजरात जन्म झालेल्या या पदार्थाला राजमान्यता मात्र पुण्यातल्या चितळेंच्या दुकानामुळे तितकंच खरं.

दुपारी १ ते ४ दुकान बंद असण्यामागची कहाणी

१९२०च्या दशकांपासून चितळेंच कुटुंब हे दुधाच्या व्यवसायात असल्यामुळे भल्या पहाटे त्यांचा दिवस सुरु व्हायचा. आजही त्यांच्या घरातील सर्वात उशिरा उठणारी व्यक्ती देखील पहाटे पावणे पाच वाजता उठते. ते त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी हे पहाटेपासून कामात गढून गेल्यामुळे दुपारी थोडी विश्रांती घेणे, कर्मचाऱ्यांना देखील विसावा देणे हा पायंडा त्यांनी अगदी सुरवातीपासून पाडला. दुकानात प्रवेश करताना रांगेची शिस्त मग भले कोणी मोठा नेता अभिनेता आला तरी त्यात खंड पडू द्यायचा नाही हा शिरस्ता सुद्धा चितळेंनी चोखपणे पाळला. त्यातूनच दुपारी १ ते ४ बंद चे विनोद तयार झाले. चितळेंना आपल्या पदार्थांच्या दर्जामुळे कधी जाहिराती कराव्या लागल्या नाहीत. पण १ ते ४ च्या विनोदामुळे आपोआपच जाहिरात मिळत गेली.

आज चितळेंची बाकरवडी त्यांच्या अनेक फ्रँचाइजी मधून विकली जाते. आपल्याला अगदी ऑनलाईन सुद्धा त्याची खरेदी करता येते. आपल्या डेक्कन जिमखान्याच्या स्टोअर पासून सगळीकडे दुपारच्या सुट्टीला त्यांनी सुट्टीला दिलीय. पण तरीही तुळशीबागेच्या खरेदीनंतर बाजीराव रोड वरील चितळे दुकानात रांगेत उभं राहून १ ते ४ चे विनोद करत बाकरवडी खरेदी करण्यात जो पुणेरीपणाचा गोडवा आहे तो इतर ठिकाणी मिळणार नाही हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT