Tempo Burn Sakal
पुणे

Narhe Accident : नवले पुलानजीक छोटा हत्ती टेम्पो जळून खाक, मुंबई बंगळुरू महामार्गावर या कारणाने झाला अपघात

मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर पुठ्ठ्याने भरलेला छोटा हत्ती टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली.

विठ्ठल तांबे

धायरी - मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर पुठ्ठ्याने भरलेला छोटा हत्ती टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड सिटी येथून पुठ्ठा भरून सातारच्या दिशेने जात असताना नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर येताच टेम्पो मधून धूर निघू लागल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतून उतरून बघितले असता शॉर्टसर्किट होत असल्याचे दिसून आले.

बघता बघता टेम्पो ने पेठ घेऊन आगीचे लोळ बाहेर पडू लागले. लगेचच अग्निशमन दलाला तसेच सिंहगड पोलिसांना वर्दी देण्यात आली काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली.

सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला मदत केली व पुढील घटनेचा तपास सिंहगड पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT