cime update pune murder of a worker out of anger at being fired shocking incident in shirur pune Sakal
पुणे

Pune Crime : कामावरून काढल्याच्या रागातून कामगाराचा खून; पुण्यातील शिरूर येथील धक्कादायक घटना

प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे काम करणाऱ्या कामगाराने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून या कामाची पाहणी करणाऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला.

नितीन बारवकर

शिरूर : प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे काम करणाऱ्या कामगाराने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून या कामाची पाहणी करणाऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. खून करून तो पळून गेला होता. तथापि, शिरूर पोलिसांनी स्थानिक तरूणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. गुरूवारी (ता. २४) रात्री उशिरा वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथे हा खूनाचा प्रकार घडला तर रात्री उशिरा खूनी तरूणाला पोलिसांनी जेरबंद केले.

आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय २४, रा. चेंबूर, मुंबई) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्या खूनप्रकरणी शाहिद रफीक बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, भुसावळ, जि. जळगाव) याला आज अटक करण्यात आली.

त्यास शिरूर न्यायालयाने मंगळवार (ता. २८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वडनेर - फाकटे रोडवर वडनेर येथे जाकीर गफार सय्यद यांचे फार्म हाऊस असून, त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताऊल्ला खान हा तेथे वास्तव्यास राहून फार्म हाऊसवरील कामे पाहात होता.

संशयित आरोपी शाहिद बागवान हा त्याच्याकडे कामासाठी म्हणून आल्याने तेथेच वास्तव्यास होता. दरम्यान, कामावरून काढून टाकल्याचा राग आल्याने त्याने आत्ताऊल्ला खान याच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

काल रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. आत्ताउल्ला याचा खून केल्यानंतर फार्महाऊसमधील खोल्यांना बाहेरून कड्या लावून शाहिद बागवान पळून गेला. तथापि, तेथील इतर कामगारांना संशय आल्याने त्यांनी एका खोलीचे दार उघडून पाहिले असता खूनाचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत माहिती समजताच शिरूर चे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व एकनाथ पाटील, पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत,

नितीन सुद्रीक, पोलिस नाईक नीलेश शिंदे व विनोद मोरे, कॉन्स्टेबल दिपक पवार यांनी दोन पथके तयार करून संशयित शाहिद बागवान याचा ठावठिकाणा शोधण्यास सुरवात केली. त्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला.

पोलिस पाटील राहुल जगताप, पोलिस मित्र दिपक घोडे व आकाश येवले यांनीही स्थानिक तरूणांना जागृत करून संशयित आरोपीबाबत माहिती दिली. काल रात्री उशिरा त्याला जांबूत (ता. शिरूर) येथील बाजारतळावरून ताब्यात घेतले. संशयित शाहिद बागवान याने खूनाची कबूली दिली असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक पन्हाळकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT