Weather Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात मोठी वाढ झाली असून दररोज अनेक भागांमध्ये गरपीट आणि पाऊसही बरसतोय. पण आता या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कारण येत्या तीन-चार दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. (Citizens across Maharashtra will get relief from heat Big drop will be in temperature IMD)
पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं की, राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. उद्यापासून पुढील ४ दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळं हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्याचं तापमान ४० डिग्रीच्यावर पोहोचलं आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे महिन्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची बऱ्याचदा नोंद झाली आहे.
४० अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे. तसेच दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत गरज नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.