पिंपरी - देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कुणीही घराबाहेर पडू नका, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी खोटी कारणे देत फिरणाऱ्या महाभागांमुळे पोलिसांवरील ताण वाढतो आहे. परिस्थितीचे कसलेही गांभीर्य नसलेले नागरिक कधी आवश्यक काम आहे सांगून तर कधी जुनी औषधांची चिठी पोलिसांना दाखवून खुलेआम फिरताना दिसतात. अशी बनवेगिरी करणाऱ्या उडाणटप्पूंना आवरा रे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
वेळ दुपारी सव्वाचारची....स्थळ बोपोडी चौक....एक हिंदीभाषिक तरुण कारमधून आला. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी कुठे निघालात अशी विचारणा करीत त्यांना
हटकले.
‘कुछ काम से बाहर निकला था,’ असे उत्तर देणाऱ्या या तरुणाला तोंडाचे मास्क कुठे आहे, असे संबंधित पोलिसाने विचारले. त्यावर गडबडलेल्या त्या तरुणाने गाडी पुसायचे फडके तोंडाला बांधले. त्यावर ‘भाईसाब देश में कोरोना बढ रहा हैं, और आप क्या कर रहे हो, समझ में आ रहा हैं क्या,’ असा सवाल करीत त्या तरुणावर कारवाईचा बडगा उगारला.
दुसऱ्या एक ठिकाणी एका नागरिकांने मी डॉक्टरकडे तपासणीसाठी निघालो आहे, असे सांगणाऱ्याला पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्याने दहा वर्षांपूर्वीची कागदपत्रे दाखवित आपली सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे घरातच बसणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकजण खोटी कारणे सांगत फिरतात. त्यामध्ये स्वतःला फसवत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. खोटे सांगून रस्त्यावर फिरणे म्हणजे जिवाशी खेळ करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवून वागण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.