Citizens Pradhan Mantri Awas Yojana project at Vadgaon Khurd uses DP road as private parking rak94 
पुणे

DP Road : डीपी रस्त्यालाच बनवले खासगी पार्किंग; वडगाव खुर्द येथील प्रकार

वडगाव खुर्द येथील प्रकल्पात प्रत्येक इमारती मध्ये 140 सदनिका, अशा एकूण आठ इमारती या प्रकल्पात आहेत.

विठ्ठल तांबे

धायरी : वडगाव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील नागरिक, पदाधिकारी यांनी इमारतीच्या मागील बाजूने जाणाऱ्या डीपी रस्त्यालाच खासगी पार्किंग केले आहे, याकडे महापालिका अधिकारी सर्रासपणे डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे.

 वडगाव खुर्द येथील प्रकल्पात प्रत्येक इमारती मध्ये 140 सदनिका, अशा एकूण आठ इमारती या प्रकल्पात आहेत. सुमारे 2 ते 3 हजारांच्या घरात येथे नागरिक राहतात. याच नागरिक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून नियोजित डीपी रस्त्यावर पार्कींग करण्यात आले आहे. यासोबतच येथे कोणत्याही संबंधित प्रशासनाची परवानगी न घेता येथील पदाधिकारी आणि सभासदांनी येथे अनधिकृत वाहनपार्कींगचे अतिक्रमण केले आहे. या डीपी रस्त्याला लागूनच या प्रकल्पाचे मुख्य गेट आहे. मात्र, रस्त्यासंदर्भातील वाद कोर्टात न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे येथील सभासद मागील गेटचा वापर करत आहेत. या प्रकरणाचा निकाल आगामी काळात कोणत्याही क्षणी लागू शकतो. त्यामुळे येथुन रस्ता सुरू होऊ शकतो. त्यावेळी येथून पुन्हा रहदारी सुरू होणार आहे. असे असतानाही येथील रहिवाशांनी असे अतिक्रमण केले आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. प्रधान आवास योजनेचे व्यवस्थापक उदय पाटील यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. --

महत्वाचे मुद्दे ....

- प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या महापालिकेच्या नियोजित डीपी रस्त्यावर सोसायटी पदाधिकारी आणि सोसायटी सभासदांकडून अनधिकृतरीत्या पार्किंग करण्यात आले आहे. - रस्त्यावर पार्किंग करणे, चुकीचे असताना सभासदांकडून सर्रासपणे नियमांची ऐशी तैशी करण्यात येत आहे - याकरता महापालिका प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही - महापालिका अधिकाऱ्यांकडून डोळे झाकपणा केला जात आहे.

डीपी रस्त्यावर कोणी अनाधिकृत पार्किंग करत असेल तर त्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात येतील तसेच त्या सोसायटीचे डीपी रस्त्याच्या बाजूचे गेट बंद करण्यात येईल. पार्किंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - नरेश रायकर,उपअभियंता ,पथ विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT