diwali festival  sakal
पुणे

Diwali Festival : आम्ही दिवाळी कशी करायची ?

दोन महिने पगार थकल्याने कामगार संतप्त

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : दोन महिने पगार नाही, आमच्या पोराबाळांनी दिवाळी कशी साजरी करायची ? असे म्हणत चारशे कंत्राटी सफाई कामगारांनी नगर रस्ता क्षेत्रिय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचा जोरदार निषेध केला. हे 400 कंत्राटी सफाई कामगार गेले दोन महिन्यापासून पगारासाठी पाठपुरावा करीत आहेत. आज दिवाळीचा पहिला दिवस आणि तरीही पगार नाही.

त्यामुळे कामगार संतप्त झाले आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान सर्व कामगार पगार का देत नाही याचा जाब विचारण्यासाठी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे जमले. येथे माजी नगरसेवक ऍड भैय्यासाहेब जाधव ,माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भाजपचे शहर उपाध्यक्ष संतोष भरणे, मनसेचे विधानसभा उपाध्यक्ष कीर्ती माछरेकर, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभागी होऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाब विचारला.

प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुकुंद घम म्हणाले, दुपार पर्यंत एका महिन्याचा पगार जमा झाला. दुसऱ्या महिन्याचा पगारही सायंकाळपर्यंत जमा होईल असे ठेकेदाराने आश्वासित केले आहे.

चौकट : दोन महिन्याचा पगार द्यायला पैसे नसतील तर माझ्या अंगावरचे कपडे विका. असे म्हणत माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी अंगावरचे कपडे काढून महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले. त्यांच्यामागे काही कामगारांनीही अंगावरचे शर्ट काढून महापालिका प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT