CNG Strike : सीएनजी वाहनं वापरणाऱ्या वाहन चालकांसाठी मोठी बामती समोर आली आहे. ही बातमी काहीशी पुणेकरांची काळजी वाढवणारी आहे.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
पुण्यात सीएनजी पंप चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे सीएनजी वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने या संपाची घोषणा करण्यात आली असून, या संपामध्ये पुणे ग्रामीणमधील सर्व पंप चालक सहभागी होणार आहे. यामुळे उद्यापासून पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद राहणार आहे.
पुणे शहरातील 'एमएनजीएल'ची सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, 'उद्यापासून टोरंट कंपनीच्या डीलरने सीएनजी खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने १-११-२०२१ रोजी सीएनजी विक्रीतील नफ्फ्याच्या हिस्साचं सुधारित परिपत्रक जारी केलं होतं. त्यानंतरही टोरंट कंपनीने एकही रुपया वाढवून दिलेला नाही'. त्यामुळे पंप चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.
नफ्याचा हिस्सा न दिल्यानं प्रत्येक सीएनजी पंप चालकांचं २० लाखांचं नुकसान झालं आहे. यामुळे सीएनजी पंप चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालक बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे रुपारेल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.