pune  sakal
पुणे

Pune : भारतीय तटरक्षक दलाने वाचवले १९ जणांचे जीव

तटरक्षक दलाने १८ भारतीय आणि एका इथिओपियन मास्टरसह १९ जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरीत्या वाचवले

अक्षता पवार

पुणे : रत्नागिरी किनाऱ्यायापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला बुडत असलेल्या जहाजातील १९ जणांना वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश मिळाले आहे. तटरक्षक दलाने १८ भारतीय आणि एका इथिओपियन मास्टरसह १९ जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरीत्या वाचवले.

यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जाणारे जहाज रत्नागिरीच्या किनाऱ्यायापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला सकाळी नऊ वाजून २३ मिनिटाला बुडत असल्याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली. जहाजातून मदती संदर्भातील संदेश आल्यानंतर काही क्षणात पथक कामाला लागले. आयसीजीएस सुजीत आणि आयसीजीएस अपूर्व या परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळविण्यात आली. तसेच परिसरातील इतर व्यापारी जहाजांना सतर्क करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेट आणि खबरदारीची सूचना देण्यात आली. तसेच सीजी हे प्रगत हेलिकॉप्टर या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले होते.

अॅस्फाल्ट बिटुमेन ३९११ एमटी हे जहाज सकाळी नऊच्या दरम्यान अचानक बुडत असल्याचे जहाजावरील क्रू मेंबर्सला निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जहाज पूर्ण बुडण्याची शक्यता असल्याचे ते वाचविण्याचे प्रयत्न सोडून दिले व मदतीसाठी संदेश पाठवला. त्याचवेळी तटरक्षक दलाकडून योग्य पद्धतीने बचाव कार्य करून या जहाजावरील १९ जणांची सुखरूप सुटका केली आहे. त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. बनविण्यात आलेले सर्व कर्मचारी सुरक्षित आहे, अशी माहिती दलाकडून देण्यात आली.

समुद्रात आलेल्या संकटाच्या प्रसंगी मदतीचा हात देत भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत ११ हजाराहून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत. सागरी तटरक्षक दल म्हणजेच 'इंडियन कोस्ट गार्ड' देशाच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेले दल आहे. या तटरक्षक दलाचे मुख्य काम हे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित असे काही आढळले तर त्यावर तत्काळ योग्य ती कारवाई करणे असे आहे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून त्यांची मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, आणि गांधीनगर येथे आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT