Cold Cough Patient sakal
पुणे

Cold Cough Fever : सर्दी, खोकला, तापाने नागरिक हैराण

सततचा पाऊस, खड्ड्यांमुळे साचलेले पाणी आणि अनेक ठिकाणी कुजलेला कचरा यामुळे डास, माश्या आणि धोकादायक विषाणू वाढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सततचा पाऊस, खड्ड्यांमुळे साचलेले पाणी आणि अनेक ठिकाणी कुजलेला कचरा यामुळे डास, माश्या आणि धोकादायक विषाणू वाढले आहेत. पाणी आणि हवेद्वारे हे विषाणू आपल्या अन्नापर्यंत आणि नंतर त्या माध्यमातून आपल्या शरीरात शिरकाव करतात. त्यामुळे होणाऱ्या सर्दी, खोकला, आणि तापाने पुणेकर हैराण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकल्यासारखे आजार होत आहेत. मात्र थंड हवेचे प्रमाण वाढल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुले आणि वयोवृद्धांना होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लहान मुले आणि ज्येष्ठ यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे व्हायरल सारख्या आजाराची लागण त्यांना लवकर होते.

अशी घ्या काळजी

१) जेवणापूर्वी हात धुवा

२) शिळे अन्न खाऊ नका

३) ताजी फळे खा

४) आहारात फळांचा रस, नारळपाणी, सूप यासारख्या गोष्टींचा समावेश करा

५) अन्नपदार्थ झाकून ठेवा

६) बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा

७) गर्दीपासून दूर राहा

८) मास्क लावा

९) पावसात भिजू नका

१०) अधिक काळ ओले कपडे घालू नका

उपाययोजना

१) घर स्वच्छ ठेवा

२) कुलर, खड्डे, कुंड्या आणि टायर्स इत्यादींमध्ये जास्त काळ पाणी साचू देऊ नका. त्यांच्यामध्ये डास पैदास करण्यास सुरवात करतात

३) पूर्ण बाही असलेले कपडे घाला. हे विशेषतः लहान मुलांनी

४) मच्छरदाणी किंवा डाळ पळवणाऱ्या छोट्या मशिन किंवा क्रीम इत्यादींचा वापर करावा

५) पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. जर पाणी कुठे साचत असेल तर सावधतेने कीटकनाशकांचा वापर करा

६) पाणी उकळून किंवा फक्त फिल्टर केलेले पाणी प्या

७) सार्वजनिक वॉशरूम सेफ्टीसह वापरा

पावसाळ्यात होणारे आजार

1) व्हायरल

पावसाळ्यामध्ये वातावरणाच्या बदलाबरोबर येणाऱ्या जंतूंमुळे व्हायरल ताप येतो. तो हवा आणि पाण्यातून पसरतो. सामान्य तापाचा प्रकार व्हायरसच्या प्रकारावर अवलंबून असतो. तापासोबतच काही लोकांना खोकला आणि सांधेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो. हा ताप तीन ते सात दिवस राहू शकतो. त्याचा कालावधी विषाणू अवलंबून असतो.

2) डेंगी आणि मलेरिया

पावसाळ्यामध्ये डासांच्या चाव्यामुळे डेंगी आणि मलेरियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. यामध्ये, सांधेदुखीसह तीव्र ताप येतो. यासह उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. डेंगीची सुरुवात तीव्र तापाने होते. डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना. तसेच, प्लेटलेट कमी झाल्यामुळे शरीरावर पुरळ उठतात.

3) हिपॅटायटिस ए

पावसाळ्यात हा आजार होण्याची शक्यता वाढते. कावीळ झाल्यास हिपॅटायटिस ए होऊ शकतो. हे यकृताच्या पेशींमध्ये संक्रमणामुळे होते. या रोगाचे सूक्ष्मजंतू दूषित खाद्यपदार्थाद्वारे किंवा उकळलेले, फिल्टर न केलेले पाणी पिल्यामुळे शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीराचे भाग पिवळे दिसतात आणि कावीळ होतो.

4) टायफॉइड

टायफॉइड हा आजार साल्मोनेला टायफी विषाणूमुळे होतो. घाणेरडे पाणी पिल्याने किंवा घाणेरडे पदार्थ खाल्याने किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने टायफॉईड होऊ शकतो.

5) बुरशी

बुरशी हवेत असते. आपण ब्रेडवर बुरशीच्या रूपात आणि झाडाच्या खोडांवर काळ्या स्वरूपात हे बघू शकतो. ही बुरशी आपल्या नाकातून त्वचेत जाते. यानंतर, हा रोग खूप वेगाने पसरतो, शरीरातील भाग नष्ट करू लागतो. ही बुरशी मेंदूतही जाते. यात मृत्यूचा दर ५० टक्के आहे.

पावसाळ्यामध्ये हवेतून पसरणारे विषाणू वाढतात तर डास आणि माश्यांची व्युत्पत्ती वाढते. यामुळे व्हायरल, डेंगी आणि मलेरिया, कावीळ, टायफॉइड आणि बुरशीचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आय. एम. ए. महाराष्ट्र राज्य

सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये व्हायरल सारख्या आजाराचे रुग्ण अधिक आहेत. यामागे पावसाळ्यात पाण्याचे होणारे प्रदूषण आणि विषाणूंचा वाढत प्रादुर्भाव ही करणे आहेत.

- डॉ. राजेंद्र जगताप, जनरल प्रॅक्टिशनर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT