pune municipal commissioner rajendra bhosale sakal
पुणे

Biomining : बायोमायनिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे बायोमायनिंगची निविदा काढण्यात आली. त्याबाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून अनेक गोष्टी समोर आणल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपोतील जैविक उत्खननाची (बायोमायनिंग) निविदा प्रकरणाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी करावी आणि या निविदेतील आर्थिक बाबींसंदर्भात मुख्य लेखा परिक्षकांनी अहवाल सादर करावा असे आदेश आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे बायोमायनिंगची निविदा काढण्यात आली. त्याबाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. या बायोनायनिंगच्या निविदा, यापूर्वी दिलेली बिले यासह सध्या अस्तित्वात असलेल्या कचऱ्यात माती किती कचरा किती याची तपासणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी शहर काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी महापालिका भवनासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे.

यावर मंगळवारी (ता. ८) रात्री महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. यावेळी सुराणा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये आयुक्तांनी या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आयुक्त भोसले यांच्याशी साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

भरत सुराणा म्हणाले, ‘महापालिका आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना आदेश दिले आहेत. या विषयातील सर्व माहितीही मला तातडीने द्यावी, यापूर्वी दिलेल्या बिलांची मुख्य लेखा परिक्षकांनी अहवाल सादर करावा असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेतले आहे. योग्य पद्धतीने चौकशी न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT