इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune solapur highway) मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर (indapur) शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. नगरसेवकांनी विकास कामांचे प्रस्ताव द्यावेत, त्यांना भरपूर निधी उपलब्ध करून देवून शहराचा चेहरा मोहरा बदलला जाईल, अशी ग्वाही बांधकाम राज्य मंत्री दत्तात्रय भरणे (dattatray bharane) यांनी दिली.
इंदापूर शहर बाब्रस मळा येथे ६० लाख रुपयांच्या अंतर्गत रस्ते व भुयारी गटार या कामाचे भूमिपूजन बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर अध्यक्षस्थानी होते. श्री.भरणे पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हानियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरास निधी दिला. शहरातील चार चौक सुशोभीकरण कामे सुरू असून शहराचा गतीने विकास सुरू आहे. शहर जुने ठेवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, मात्र शहर विकासात राजकारण न आणता माझ्या व उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निधीचा फायदा घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदिप गारटकर म्हणाले, इंदापूर विद्याप्रतिष्ठान तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने बाब्रस मळा परिसराचे महत्व वाढले आहे. तालुका क्रीडा संकुल, टाऊन हॉल तसेच शहरातील अंतर्गत रस्ते यासाठी मंत्री भरणे यांनी ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे शहर विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.
यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे व सुरेश गवळी, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राजेंद्र चौगुले, विनायक बाब्रस,अजित मारकड,रामदास चौगुले, बाळासाहेब मखरे, अनिकेत वाघ, अमर गाडे, श्री.लोखंडे, बाळासाहेब म्हेत्रे, गणपत गवळी, मनोज भापकर,दत्तू शिंदे, गणेश गोरे, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, विठ्ठल बानकर, विवेक चौगुले, सागर मिसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.