Vanaj to Ramwadi Pune metro Sakal
पुणे

Pune Parking : मेट्रोस्थानकाजवळ वाहनतळासाठी जागेचा शोध घेण्यासाठी समिती

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गात बदल करण्यात आल्यानंतर मेट्रो स्थानकाजवळ वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गात बदल करण्यात आल्यानंतर मेट्रो स्थानकाजवळ वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका व महामेट्रोचे अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाणार असून हे अधिकारी प्रत्यक्ष जागा पाहणी करून वाहनतळासाठी जागा निश्‍चित करणार आहेत.

महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. त्यामध्ये मेट्रो स्टेशनजवळ वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा चर्चेत आला. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग डेक्कन, आगाखान पॅलेस या भागात बदलण्यात आला.

जंगली महाराज रस्त्यावरून जाणारी मेट्रो डेक्कन कॉर्नर येथून नदीपात्रातून महापालिकेच्या दिशेने नेण्यात आली. तर आगाखान पॅलेस ही वास्तू ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये असल्याने मेट्रोच्या कामाला परवानगी न मिळाल्याने मेट्रो मार्गात बदल करण्यात आला.

वनाजकडून येणारी मेट्रो नगर रस्त्यावर येरवडा येथून कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आली व पुढे ती पुन्हा रामवाडी येथे नगर रस्त्याला जोडण्यात आली. त्यामुळे मेट्रो स्थानकांची जागाही बदलली आहे. वनाज ते रूबी हॉल क्लिनिक या दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाली आहे. तर नगर रस्त्यावरील मेट्रो सेवा पुढील काही महिन्यात सुरू होणार आहे.

मेट्रो प्रवाशांना त्यांची वाहने स्थानकाजवळ लावण्यासाठी वाहनतळ आवश्‍यक असल्याने या मार्गालगतच्या जागांची पाहणी करून त्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. यासाठी महापालिका व महामेट्रोच्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाईल.

ही समिती प्रत्यक्ष जागांची पाहणी करून वाहनतळासाठी जागा निश्चित करणार आहे. महापालिकेच्या जागेवर महामेट्रो वाहनतळ विकसित करणार असून, असे प्रकल्प विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT