पुणे

दोन चिमुकल्यांवर गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

CD

पुणे, ता. १५ : घरची आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील शिवाज्ञा सातपुते या एक वर्षाच्या आणि समर्थ देवकर या तीन वर्षांच्या चिमुकल्यांच्या हृदयाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने करण्यात आल्या. जहाँगीर रुग्णालयामध्ये पाच ते सहा तास या शस्त्रक्रिया चालल्या. शस्त्रक्रियेनंतर जहाँगीर रुग्णालयाचे विश्‍वस्त, पदाधिकारी व दोन्ही कुटुंबांनी मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया विविध रुग्णालयांत करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. त्याअंतर्गत दोन चिमुकल्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच झाल्या. त्यानंतर मंदिरात आरती करण्यास जहाँगीर रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. एच. सी. जहाँगीर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद सावंतवाडकर, गोपाळ फडके, डॉ. अशोक घोणे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सूर्यवंशी म्हणाले, ‘‘ट्रस्ट आणि विविध रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकतेच दोन लहान मुलांची हृदयशस्त्रक्रिया झालेली दोन्ही कुटुंबे ग्रामीण भागातील आहेत. या एका शस्त्रक्रियेचा खर्च सात ते आठ लाख रुपये होता. मात्र, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करून देण्यात आली. गरजू रुग्णांनी ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधावा, त्यांना आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न ट्रस्ट नक्कीच करेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT