Great confusion about the destruction of Covid 19 from the use of ozone.jpg 
पुणे

ओझोनच्या वापरातून कोरोना विषाणू नष्ट केला जाऊ शकतो? शास्त्रज्ञ म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

पुणे : ओझोनच्या वापरातून कोरोना विषाणू नष्ट केला जाऊ शकतो. या बद्दल अजून मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. तसेच ओझोनच्या काही ठराविक प्रमाणातील डोसचा वापर केल्याने कोरोना विषाणूला 99 टक्के नष्ट करणे शक्य आहे. परंतु मानवी शरीरासाठी अगदी थोड्या प्रमाणात ओझोन घेणे हानिकारक ठरू शकते. अशी माहिती भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ओझोने पासून कोविड 19 हा विषाणू नष्ट होण्याबद्दल अजूनही वैज्ञानिकसिद्ध अभ्यास नसल्याने या बद्दल ठोस काही म्हणता येणार नाही असे डॉ. बेग यांनी स्पष्ट केले. सध्या देशात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयआयटीएमच्या वतीने नुकतेच ऑनलाईन सत्राचे आयोजन केले होते. डॉ. बेग या सत्राचे प्रमुख वक्ते होते. तर 'वायू प्रदूषण आणि कोविड 19' हा या सत्राचा मुख्य विषय होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी डॉ. बेग म्हणाले, 'सूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5 आणि पीएम 10) व भूस्तरावरील ओझोन हे प्रदूषक मानवी शरीरासाठी घातक असतात. गेल्या तीन चार दिवसांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक झाल्यावर वातावरणातील आद्रता कमी होत ओझोन या घटकात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ओझोन हा कोरोना विषाणूच्या बाह्य कवचला 'ऑक्सिडेशन' प्रणालीद्वारे नष्ट करण्यास सक्षम असून ते या विषाणूच्या आत प्रवेश करून त्याच्या 'आरएनए'मध्ये बिघाड आणू शकतो. ओझोनचा वापर हा योग पद्धतीत केल्याने हा फायद्याचा ठरू शकतो. परंतु हे नक्कीच कोरोनासाठी योग्य पर्याय आहेका अद्याप सिद्ध झाले नाही. ओझोन हा जरी घातक अतिनील (यूव्ही) उत्सर्जनांपासून बचाव करण्यास सक्षम असला तरी थोड्या प्रमाणात ओझोन डोसचा वापर मानवी शरीरासाठी घातक ठरतो. त्यामुळे अस्थमा, श्वसनाशी संबंधीत विविध आजार उद्भवतात." 

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात केलेल्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की तापमानाचा कोविड 19 वर कोणताही परिणाम होत नाही. तसेच एरवी वाहन आणि इतर गोष्टींमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा सुद्धा या विषाणूवर कोणता परिणाम होत नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी​

लॉकडाऊनच्या काळात असा झाला प्रदूषणात बदल
- लॉकडाऊनच्या काळात उद्योक, गाड्यांचे प्रमाण, फॅक्टरीचे कार्य पूर्णतः बंद
- वायू प्रदूषणातील अतिसूक्ष्म धूलिका, नायट्रोजन ऑक्सईड आणि सूक्ष्म धूलिका या प्रदूषकांमध्ये घट
- लॉकडाऊनच्या काळात सर्व नागरिक घरीच असल्याने जैवइंधन उत्सर्जनात (एलपीजी) वाढ झाली
- लोकडाऊनच्या काळात काही शहरांमधील भूस्तरावरील ओझोनेच्या प्रमाणत वाढ 
- हवामानाची गुणवत्ता समाधानकारक आणि चांगली झाली


पुणेकर दारूसाठी अपाॅइंटमेंट घेण्यातही आघाडीवर

''प्रत्येक शहरांमध्ये कायमस्वरूपी ठराविक प्रमाणातील वायू प्रदूषण नेहमी असते व त्याला 'बेस लाईन' वायू प्रदूषण असे म्हणले जाते. हे प्रदूषण सामान्यतः पर्यावरणात प्राकृतिक स्वरूपात आढळणारे धूलिकण असतात. लॉकडाऊनच्या काळात 'बेस लाईन' वायू प्रदूषणाच्या अभ्यासाला वेळ मिळाला. या अभ्यासातून असे निदर्शनास आले की 'बेस लाईन' वायू प्रदूषण आणि कोविड 19 मध्ये सुमारे 80 टक्के संबंध आहे."
- डॉ. गुफ्रान बेग, सफरचे संचालक व शास्त्रज्ञ - आयआयटीएम

बारामतीतील त्या सतरा जणांची कोरोना टेस्ट

वायू प्रदूषणाच्या उत्सर्जनाचे स्रोत
- वाहन
- वीटभट्टी
- बांधकामाचे ठिकाण
- कचऱ्याला जाळणे
- उद्योग, कारखाने
- हॉटेल, रेस्टॉरंट
- विमानतळ, रेलवे स्टेशन
- जैवइंधन (गॅस, जळण)
- विद्युत प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT