पुणे - पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये रजा मुदतीच्या शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी उपोषणकर्त्या शिक्षकास रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ झाला. अखेर शिक्षकांनी त्यास विरोध केल्याने पोलिसांनी नमते घेतले, त्यामुळे आज (शनिवारी) दुसऱ्या दिवशीही आंदोलन होते.
पुणे महापालिकेमध्ये २००९ आणि २०११ मध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवक म्हणून शिक्षक भरती करण्यात आली होती. त्यामध्ये ९३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे आदेश शिक्षण मंत्रालयाने दिले होते, पण महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली नसल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचा निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला असून, सहा आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश फेब्रुवारी २०२३ मध्ये दिले आहेत. पण चार महिने उलटले तरीही शिक्षण विभागाने कार्यवाही केले नसल्याने शुक्रवारपासून (ता. १६) शिक्षकांनी महापालिका भवनापुढे बेमुदत आंदोलन सुरू केले असून, यामध्ये प्रकाश शिंदे हे उपोषण करत आहेत.
शुक्रवारी दिवसभर आंदोलन केल्यानंतर रात्री १२च्या सुमारास डॉक्टरांनी प्रकाश शिंदे यांचा रक्तदाब तपासला असता तो वाढल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तुम्ही इथून उठा आणि रुग्णालयात जा असे सांगत जबरदस्ती करण्यास सुरवात केली. त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला. अखेर शिक्षकांनी त्यास विरोध केला.
आंदोलनादरम्यान काही झाले तर आम्हीच जबाबदार असू असे पोलिसांनी लेखी दिले आहे. पोलिसांनी आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पण मी उपोषण सोडणार नाही. महापालिका प्रशासनाने अद्याप आंदोलनाची दखल घेतलेली नाही, असे प्रकाश शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, आज (शनिवार) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेपुढे शिक्षकांचे आंदोलन सुरू होते.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद निरीक्षक म्हणाले, ‘आंदोलनकर्त्यांचा बीपी वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने आम्ही त्यांना रुग्णालयात नेत होतो. पण त्यांनी नकार दिल्याने व तसे लिहून दिल्याने त्यांना घेऊन गेलेलो नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.