पुणे : पुण्यात विधानसभेच्या दोन जागेंसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सतर्क झाले असनू निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. (Kasba Peth Bypoll Election)
दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने आपली अधिकृत भुमिका जाहीर केली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "कोल्हापूर, सोलापूर, अंधेरी येथील निवडणुकांमध्ये भाजपने उमेदवार दिला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडणूक लढवणार असल्यामुळे ही निवडणूक गाजेल," असे शिंदे म्हणाले.
अरविंद शिंदे म्हणाले, "उमेदवारीचे तिकीट कुणाला द्यायचे, यांची काँग्रेसमध्ये एक पद्धत आहे. इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आले आहे. लवकरच प्रदेश कमिटीकडून या नावाची घोषणा करण्यात येणार आहे, प्रदेश कमिटीकडून जी फायनल यादी येणार आणि तीच व्यक्ती निवडणूक लढवणार आहे."
यापूर्वी भाजपने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष असणार आहे. जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरले तर भाजपच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.
कसबा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसही दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
परंपरागत कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की बिनविरोध करायची यावर चर्चा होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.