Pune News esakal
पुणे

Pune News : पुण्यातील शहराध्यक्ष बदलण्यासाठी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ नेत्यांकडे

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेस पक्षाला पुण्यात सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्त्वात बदल करावा, अशी मागणी कॉंग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे केली. ‘पुण्यातील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. या बाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल,’ असे चेन्निथला यांनी शिष्टमंडळास सांगितले.

कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे तसेच दत्ता बहिरट, चंदू कदम, अविनाश बागवे, जयंत किराड, साहिल केदारी, नुरद्दीन इनामदार, रमेश अय्यर, अजय खळदकर, विशाल मलके आदींच्या शिष्टमंडळाने चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने चेन्निथला यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल, असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी, त्यांची भेटही शिंदे यांनी घेतली नव्हती. बूथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा, कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे.

त्यासाठी पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्त्वात बदल करण्याची गरज आहे.’ पक्षांतर्गत वादगांचीही काही उदाहरणे या निवेदनात नमूद करण्यात आली आहेत. या बाबत रमेश बागवे म्हणाले, ‘‘कॉंग्रेस पक्ष पुण्यातही वाढविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. बूथस्तरापासून नव्याने घडी बसवावी लागणार आहे. पक्षाचा विचार करून शहर नेतृत्त्वात बदल करावा, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.’’ या बाबत शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT