congress party esakal
पुणे

Congress : काँग्रेस भवनात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस भवनात आलेले असतानाच तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकार आज (ता. २२) दुपारी घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाजूला काढले.

पुणे लोकसभेत झालेल्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यासाठी नाना पटोले यांनी काँग्रेस भवनमध्ये बैठक आयोजित केली होती. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मुकेश धिवार हे दुपारी अडीचच्या सुमारास काँग्रेस भवनात आले होते. धिवार आणि त्यांचे मित्र महेश चव्हाण हे दोघे शहर काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यासाठी त्यांनी पोस्टर तयार करून आणले होते. त्यामध्ये प्रमुख नऊ पदाधिकाऱ्यांची नावे टाकून यांच्यात आता बदल होणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. हे पोस्टर उघडण्यापूर्वीच त्यांना काही कार्यकर्त्यांनी मारहाण सुरु केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मारहाण करणारे कार्यकर्ते पळून गेले.

मुकेश धिवार म्हणाले, ‘‘ काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बदल होणार की या आशयाचे मी पोस्टर घडण्यापूर्वीच मला मारहाण करण्यात आली. हे कार्यकर्ते आबा बागूल यांचे होते. मारहाण करणाऱ्या १५ ते २० जणांविरोधात मी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.’’

आबा बागूल म्हणाले, ‘‘या घटनेचा माझा काही संबंध नाही. त्या पोस्टरमध्ये माझे नाव देखील नाही. तरीही आमच्यावर आरोप होत असतील तर पोलिसांनी योग्य तो तपास करावा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT