Chandrakant Patil sakal
पुणे

Chandrakant Patil : पूरग्रस्त भागातील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी भागातील पूरग्रस्त भागांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

सकाळ वृत्तसेवा

औंध - पाषाणमधील सोमेश्वरवाडीसह बाणेर-‌ बालेवाडी भागातील पूरसदृश्य परिस्थिती ही नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने झाली. त्यामुळे महापालिकेने सर्व भागांचे सर्वेक्षण करुन नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्यास प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.

सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी भागातील पूरग्रस्त भागांची मंत्री पाटील यांनी पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

यावेळी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता दीपक लांडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, भाजपा उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर,माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या पूनम विधाते, कल्याणी टोकेकर, गोकुळ जाधव, यश ताम्हाणे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी आदी भागांत नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्यासाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

तसेच ज्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढवणे आवश्यक आहे. त्याचेही सर्वेक्षण करुन योग्य त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, ज्या भागात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आवश्यक आहेत. त्या भागाचेही सर्वेक्षण करावे. आमदार निधीतून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन यावेळी मंत्री पाटील यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT