co oprative society sakal
पुणे

सहकारी पतसंस्था होणार अत्याधुनिक

‘व्हिजन २०२५’: पतसंस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सहकारी पतसंस्थांनी व्यवसायात वाढ करण्यासोबतच ठेवीदार-खातेदारांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हिजन २०२५’ अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान (modern Technology) प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सहकार खात्याची मान्यता मिळाल्यानंतर क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित आणि शाखाविरहित पतसंस्था सुरू करणे शक्य होणार आहे. (Cooperative credit societies will happen modern)

राज्यात सध्या मोठ्या पतसंस्थांचा अपवाद वगळता इतर पतसंस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुलनेत कमी होतो. त्यामुळे काही नागरी सहकारी बॅंकांच्या तुलनेत पतसंस्थांच्या ठेवी अधिक असूनही पतसंस्थेत नफ्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पतसंस्थांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पतसंस्थांकडून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित बॅंकिंग, शाखाविरहित पतसंस्था आणि निओ बॅंकिंग प्रणाली अशा विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येणार आहे.

सहकार खात्याकडून सध्या नवीन शाखांना परवानगी दिली जात नाही. नवीन शाखेसाठी कार्यालयीन जागा, फर्निचर आणि कर्मचाऱ्यांवरील वेतनाचा खर्च वाढतो. सध्या विविध पतसंस्थांमध्ये कामकाजासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान वापरले जाते. परंतु भविष्यात सर्व पतसंस्थांना संलग्न ठेवणारे तंत्रज्ञान असणे अपेक्षित आहे. निओ बॅंकिंग प्रणाली सुरू केल्यास नवीन शाखेची इमारत आणि फर्निचरवरील खर्चही टळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनमार्फत सहकार खात्याकडे देण्यात येणार आहे.

पतसंस्थांसाठी एकच क्रेडिट कार्ड

सध्या अंडी किंवा बदाम अशा व्यवसायांतील उद्योजक त्यांच्या उत्पादनाची एकत्रित जाहिरात करतात. त्याच धर्तीवर सर्व सहकारी पतसंस्था एकत्रित येऊन व्यवसायाचे मार्केटिंग करणार आहेत. तसेच, सर्व पतसंस्थांसाठी एकच क्रेडिट कार्ड सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसांत अशा स्वरूपाचे क्रेडिट कार्ड पतसंस्था फेडरेशनकडून आणले जाणार आहे.

"राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने क्लाउडवर आधारित बॅंकिंग, शाखाविरहित बॅंकिंग, निओ बॅंकिंग असे पर्याय स्वीकारण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयात देण्यात येणार आहे. त्याला मान्यता मिळाल्यास पतसंस्थांना त्यांचा कारभार पारदर्शक आणि गतीने करता येणार आहे," अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

  • पुणे जिल्ह्यातील पतसंस्था १३००

  • सभासद सुमारे १६ लाख

  • राज्यातील पतसंस्था १३ हजार ६०५

  • सभासद सुमारे २ कोटी २५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT