पुणे

कोथिंबिरीने बनविले अवघ्या ४० दिवसांत लखपती

CD

खुटबाव, ता. ६ : पिंपळगाव (ता. दौंड) येथील प्राथमिक शिक्षक दत्तात्रेय नरसिंग नातू यांनी एक एकर क्षेत्रामध्ये कोथिंबिरीच्या पिकातून अवघ्या ४० दिवसांमध्ये तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. एका जुडीला ३० ते ३५ रुपये बाजारभाव मिळाला. सलग चार दिवस कोथिंबिरीची विक्रमी बाजारभावात विक्री करत नातू लखपती बनले आहेत.

नातू यांच्याकडून अनेक शेतकरी, छोटे व्यापारी यांनी कोथिंबिरीची खरेदी केली. सध्या कोथिंबीर काढून झाल्यानंतर त्यांनी उसाप्रमाणे कोथिंबिरीचा खोडवा राखला आहे. त्यातून ३००० पेंढी पुन्हा निघणार आहे. यातून त्यांना १ लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल, असे विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

असे घेतले उत्पादन
- मुरमाड काळवट जमिनीमध्ये चौकोनी आकाराचे सारे काढले.
- शेतीमध्ये १०० किलो कोथिंबिरीचे बी फेकले.
- शेतामध्ये रेन पाइप पद्धती अवलंबन दररोज पहाटे पाणी दिले.
- खते व औषधांची फवारणी केल्यानंतर पीक काढले


खोती पद्धत बंद झाल्याने विलक्षण फायदा
गावातील शेतमजूर महिलांच्या साह्याने ७० रुपये शेकडा पेंडी याप्रमाणे १० हजार पेंड्या शेतामध्ये तयार करण्यात आल्या. दररोज किमान अडीच हजार पेंड्या टेंपोमध्ये भरून नातू यांनी मांजरी येथील उप बाजारामध्ये स्वतः जाऊन विकल्या. मांजरी येथे खोती पद्धत बंद झाल्याने नातू यांना विलक्षण फायदा झाला.


वडिलोपार्जित २५ एकर शेत जमीन आहे. शिक्षक असलो तरी काळी आहे कसण्याची आवड आहे. यावर्षी ४५ दिवस उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मेथीचा प्रयोग केला व तो कमालीचा यशस्वी ठरला. या कामी मोठे बंधू भीमा पाटसचे संचालक चंद्रकांत नातू व कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
- दत्तात्रेय नातू, कोथिंबीर उत्पादक

१ एकर .......एकूण क्षेत्र
४० दिवस......... पिकाचा कालावधी
१० हजार......... कोथिंबीर गड्डी
३० ते ३५ रुपये .............प्रत्येक गड्डीला किमान बाजारभाव
५० हजार रुपये ....सरासरी खर्च
३ लाख रुपये....एकूण उत्पन्न


01161

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT